'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

रोजच्या भाजीला हटके ट्विस्ट! घरच्या घरी बनवा 'क्रीमी गार्लिक मशरूम-पालक'; वाचा रेसिपी

मशरूम, पालक आणि लसणाच्या चवीसोबत क्रीमी असलेली ही भाजी चपाती, पराठा किंवा ब्राऊन राईससोबत अप्रतिम लागते.

किशोरी घायवट-उबाळे

दररोज तीच-ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी 'क्रीमी गार्लिक मशरूम आणि पालक' ही झटपट आणि पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करा. मशरूम, पालक आणि लसणाच्या चवीसोबत क्रीमी असलेली ही भाजी चपाती, पराठा किंवा ब्राऊन राईससोबत अप्रतिम लागते.

साहित्य :

  • २०० ग्रॅम बटन मशरूम (स्वच्छ धुवून चिरलेले)

  • १ कप बारीक चिरलेला पालक

  • ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या (बारीक चिरलेल्या)

  • १/२ कप ओट्सचे दूध किंवा बदामाचे दूध

  • १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल

  • १/२ टीस्पून काळी मिरी पावडर

  • चवीनुसार मीठ

कृती :

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण सोनेरी होईपर्यंत परता. आता त्यात चिरलेले मशरूम घालून मध्यम आचेवर ५ मिनिटे परता. मशरूममधून सुटलेले पाणी आटेपर्यंत शिजवा.

त्यानंतर चिरलेला पालक घालून २ मिनिटे परता, जोपर्यंत तो मऊ होत नाही. गॅस मंद करून त्यात ओट्सचे किंवा बदामाचे दूध घाला आणि हलक्या हाताने ढवळा.

आता काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून २ मिनिटे मंद आचेवर शिजवा. ग्रेव्ही क्रीमी आणि किंचित घट्ट झाली की गॅस बंद करा. गरमागरम क्रीमी गार्लिक मशरूम आणि पालक चपाती, पराठा किंवा ब्राऊन राईससोबत सर्व्ह करा.

घरगुती पर्याय (Milk Substitutes)

  • नारळाचे घट्ट दूध: व्हिगन पर्याय म्हणून उत्तम. यामुळे भाजीला दाटपणा आणि हलकी गोडसर चव मिळते.

  • काजूची पेस्ट: ६ ते ७ काजू १० मिनिटे कोमट पाण्यात भिजवून त्याची बारीक पेस्ट तयार करा. यामुळे भाजीला हॉटेलसारखे क्रीमी टेक्सचर मिळते.

  • साधे दूध आणि साय: व्हिगन आहाराचे बंधन नसल्यास साधे दूध आणि थोडी ताजी साय वापरूनही ही भाजी बनवू शकता.

टिप्स :

  • मशरूम धुतल्यानंतर लगेच वापरा. जास्त वेळ पाण्यात ठेवल्यास त्यांचा पोत बदलू शकतो.

  • वनस्पती-आधारित दूध घालताना गॅस नेहमी मंद ठेवा, त्यामुळे दूध फाटत नाही.

  • अधिक सुगंधासाठी शेवटी थोडे ओरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स भुरभुरवू शकता.

  • भाजी अधिक क्रीमी हवी असल्यास काजूची पेस्ट घाला.

  • ही भाजी चपाती, गार्लिक ब्रेड, पराठा, मल्टीग्रेन ब्रेड किंवा ब्राऊन राईससोबत सर्व्ह केल्यास अधिक स्वादिष्ट लागते.

Delhi Riots 2020 : गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा हत्येप्रकरणी माजी AAP नगरसेवक ताहीर हुसेनला जन्मठेप

Bhiwandi Building Collapse : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

August 2026 Dry Days : ऑगस्टमध्ये पार्टीचा प्लॅन करताय? 'या' २ दिवशी बंद राहणार दारूची दुकाने

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जादा सामानासाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही; जाणून घ्या नवे नियम