बटाट्याला द्या नवा ट्विस्ट! झटपट तयार करा खमंग 'आलू कुरकुरे' 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

बटाट्याला द्या नवा ट्विस्ट! झटपट तयार करा खमंग 'आलू कुरकुरे'

बटाटे, पोहे आणि काही मोजक्या मसाल्यांपासून तयार होणारा हा स्नॅक बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ लागतो.

किशोरी घायवट-उबाळे

संध्याकाळी चहासोबत काहीतरी गरमागरम आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असेल, तर आलू कुरकुरे हा उत्तम पर्याय आहे. बटाटे, पोहे आणि काही मोजक्या मसाल्यांपासून तयार होणारा हा स्नॅक बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ लागतो. अवघ्या २५ मिनिटांत तयार होणारी ही सोपी रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.

साहित्य :

  • ४ लहान आकाराचे बटाटे

  • ३/४ कप मैदा

  • ३/४ कप पोहे

  • १ ते २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • १ टीस्पून जिरेपूड

  • मूठभर पुदिन्याची पाने (बारीक चिरलेली)

  • १ टीस्पून लिंबाचा रस

  • चवीनुसार मीठ

  • आवश्यकतेनुसार पाणी

  • तळण्यासाठी तेल

कृती :

सर्वप्रथम बटाटे कुकरमध्ये उकडून त्यांची सालं काढा आणि एका भांड्यात चांगले मॅश करून घ्या. त्यामध्ये पुदिन्याची पाने, हिरव्या मिरच्या, जिरेपूड, मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण एकजीव करा.

तयार मिश्रणाचे समान आकाराचे छोटे गोळे तयार करून बाजूला ठेवा. दुसऱ्या भांड्यात मैदा आणि पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. प्रत्येक बटाट्याचा गोळा प्रथम मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवा आणि नंतर पोह्यांमध्ये घोळवून त्याला कुरकुरीत कोटिंग द्या.

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हे गोळे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. गरमागरम आलू कुरकुरे हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा चहासोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • बटाटे जास्त शिजवू नका, अन्यथा मिश्रण पातळ होऊ शकते.

  • पोहे जाडसर कुटून वापरल्यास कुरकुरीतपणा अधिक येतो.

  • मैद्याचा घोळ खूप पातळ ठेवू नका, त्यामुळे कोटिंग व्यवस्थित बसते.

  • तळताना तेल मध्यम तापमानावर ठेवा, म्हणजे कुरकुरे बाहेरून खुसखुशीत आणि आतून छान शिजतील.

  • अधिक चवदार बनवण्यासाठी मिश्रणात कोथिंबीर, चाट मसाला किंवा लाल तिखटही घालू शकता.

  • कमी तेलात बनवायचे असल्यास हे कुरकुरे एअर फ्रायरमध्येही तयार करू शकता.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती