भजी-पकोड्यांना द्या सुट्टी! यावेळी ट्राय करा खमंग क्रिस्पी फ्राईड फ्लॉवर 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

भजी-पकोड्यांना द्या सुट्टी! यावेळी ट्राय करा खमंग क्रिस्पी फ्राईड फ्लॉवर

घरातील छोट्या पार्टीसाठी, पाहुण्यांसाठी किंवा वीकेंड स्नॅक म्हणून ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे.

किशोरी घायवट-उबाळे

संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खमंग आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा झाली की भजी किंवा पकोडे आठवतात. मात्र यावेळी काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल, तर क्रिस्पी फ्राईड फ्लॉवर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असलेला हा स्नॅक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. घरातील छोट्या पार्टीसाठी, पाहुण्यांसाठी किंवा वीकेंड स्नॅक म्हणून ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे.

साहित्य :

  • १ मध्यम आकाराचा फ्लॉवर

  • १ कप मैदा

  • १ टीस्पून लसूण पावडर

  • १ टीस्पून लाल तिखट

  • अर्धा टीस्पून मीठ

  • पाव टीस्पून काळी मिरी पावडर

  • पाऊण कप दूध

  • तळण्यासाठी तेल

कृती :

सर्वप्रथम फ्लॉवर स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. त्यावरील हिरवी पाने आणि देठ काढून समान आकाराचे छोटे तुकडे (फ्लोरेट्स) करा.

एका भांड्यात मैदा, लसूण पावडर, लाल तिखट, मीठ आणि काळी मिरी एकत्र करून मिश्रण तयार करा. दुसऱ्या भांड्यात दूध घ्या. प्रत्येक फ्लॉवरचा तुकडा आधी दुधात बुडवा आणि नंतर मैद्याच्या मिश्रणात घोळवा. सर्व बाजूंनी कोटिंग झाल्यानंतर अतिरिक्त मिश्रण हलके झटकून टाका.

कढईत तेल गरम करून मध्यम ते मोठ्या आचेवर फ्लॉवरचे तुकडे तळा. ३ ते ४ मिनिटे किंवा सोनेरी रंग येईपर्यंत तुकडे तळून घ्या. तयार फ्राईड फ्लॉवर टिश्यू पेपरवर काढा आणि गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स :

  • फ्लॉवरचे तुकडे समान आकाराचे ठेवल्यास ते एकसारखे शिजतात.

  • अधिक कुरकुरीत पोत हवी असल्यास मैद्याच्या मिश्रणात थोडे कॉर्नफ्लोअर घालू शकता.

  • तळण्यापूर्वी फ्लॉवर पूर्णपणे कोरडी असावी, त्यामुळे कोटिंग चांगले चिकटते.

  • तेल योग्य तापमानाला गरम असणे आवश्यक आहे. खूप थंड तेलात तळल्यास फ्लॉवर तेलकट होऊ शकते.

  • चवीसाठी वरून चाट मसाला किंवा पेरी-पेरी मसाला भुरभुरवा.

  • टोमॅटो सॉस, मेयोनीज किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह केल्यास चव अधिक वाढते.

सर्व्हिंग सजेशन :

गरमागरम क्रिस्पी फ्राईड फ्लॉवरवर थोडी कोथिंबीर आणि चाट मसाला भुरभुरून सर्व्ह करा. चहा, कॉफी किंवा थंड पेयांसोबत हा स्नॅक घरातील सर्वांचा आवडता ठरू शकतो.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती