चहासोबत बनवा स्पेशल 'ओट्स मसाला वडा'; प्रत्येक घासात मिळेल खमंग चव 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

चहासोबत बनवा स्पेशल 'ओट्स मसाला वडा'; प्रत्येक घासात मिळेल खमंग चव

हा वडा बनवण्यासाठी साहित्य रात्रभर भिजवण्याची तयारी करावी लागत नाही. अवघ्या ३० मिनिटांत हा स्वादिष्ट पदार्थ तयार होतो.

किशोरी घायवट-उबाळे

दररोज भजी, वडे किंवा पकोडे खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी पौष्टिक ओट्स मसाला वडा नक्की ट्राय करा. ओट्स, तांदळाचे पीठ आणि मसाल्यांपासून तयार होणारा हा वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतो. विशेष म्हणजे हा वडा बनवण्यासाठी साहित्य रात्रभर भिजवण्याची तयारी करावी लागत नाही. अवघ्या ३० मिनिटांत हा स्वादिष्ट पदार्थ तयार होतो.

साहित्य :

  • १ कप ओट्स

  • १/३ कप घट्ट दही

  • १/२ कप तांदळाचे पीठ

  • १ इंच आले

  • १ ते २ हिरव्या मिरच्या

  • १/२ टीस्पून मीठ

  • १/२ टीस्पून काळी मिरी पावडर

  • तळण्यासाठी तेल

कृती :

१. सर्वप्रथम ओट्स मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पावडर तयार करा.

२. एका भांड्यात ओट्सची पावडर, तांदळाचे पीठ, बारीक चिरलेले किंवा ठेचलेले आले, हिरव्या मिरच्या, मीठ आणि काळी मिरी पावडर घालून एकत्र करा.

३. आता त्यात घट्ट दही घालून मऊसर पण घट्ट पीठ मळून घ्या. पीठ खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

४. तयार पिठाचे लहान गोळे करून हलकेच दाबून वड्याचा आकार द्या.

५. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हे वडे सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

६. गरमागरम ओट्स मसाला वडा हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • अधिक कुरकुरीत पोत मिळवण्यासाठी ओट्स बारीक वाटूनच वापरा.

  • दही नेहमी घट्ट वापरा. पातळ दही वापरल्यास पीठ पातळ होऊ शकते.

  • तिखट चव हवी असल्यास हिरव्या मिरच्यांचे प्रमाण वाढवू शकता.

  • वडे मध्यम आचेवर तळल्यास ते आतून व्यवस्थित शिजतात आणि बाहेरून छान कुरकुरीत होतात.

  • बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता किंवा जिरेही मिश्रणात घालू शकता.

  • कमी तेलात बनवायचे असल्यास हे वडे एअर फ्रायरमध्ये किंवा अप्पे पॅनमध्येही तयार करू शकता.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती