छायाचित्र : पिंटरेस्ट
लाईफस्टाईल

Dev Deepawali 2025 : ५ नोव्हेंबरला साजरी होणार देव दिवाळी! 'या' शुभ वेळेत लावा दिवे आणि मिळवा महादेवांचा आशीर्वाद

देव दिवाळीच्या दिवशी ११, २१, ५१ किंवा १०८ दिवे लावण्याची परंपरा आहे. श्रद्धेनुसार आपण यापेक्षा अधिक दिवेही लावू शकता.

Mayuri Gawade

दिवाळी संपली तरी अजून एक दिवाळी बाकी आहे, 'देव दिवाळी'! दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा दिवस ‘देवांची दिवाळी’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी भगवान शिवाची पूजा करून दिवे लावण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, या दिवशी दिवे लावल्याने सर्व दुःख, आजार आणि संकट दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.

देव दिवाळी कधी आहे?

पंचांगानुसार, यंदा कार्तिक पौर्णिमा तिथी ४ नोव्हेंबर रात्री १०:३६ पासून ते ५ नोव्हेंबर संध्याकाळी ६:४८ पर्यंत असेल. त्यामुळे देव दिवाळी बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरी केली जाईल.

दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त

या दिवशी प्रदोष काळात दिवे लावणे सर्वात शुभ मानले जाते.

  • शुभ वेळ: संध्याकाळी ५:१५ ते ७:५०

  • एकूण शुभ काळ: २ तास ३५ मिनिटे
    या वेळेत दिवे लावल्याने पुण्यप्राप्ती होते, असे मानले जाते.

किती दिवे लावावेत?

देव दिवाळीच्या दिवशी ११, २१, ५१ किंवा १०८ दिवे लावण्याची परंपरा आहे. श्रद्धेनुसार आपण यापेक्षा अधिक दिवेही लावू शकता.

देव दिवाळीमागील श्रद्धा

असं म्हटलं जातं की, या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून त्रिलोकात शांतता निर्माण केली होती. या घटनेच्या स्मरणार्थ देव दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे.

म्हणून या ५ नोव्हेंबरला प्रदोष काळात दिवे लावा आणि घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि शिवकृपेचा प्रकाश पसरवा!

Goa Nightclub Fire : गोव्याच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग; २३ जणांचा मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

Goa Nightclub Fire : आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त, मृतांच्या कुटुंबीयांना धीर; सरकारकडून मदतीचे आश्वासन

हिवाळी अधिवेशन ठरणार वादळी; संपूर्ण कर्जमाफी, भ्रष्टाचार, मतचोरीवरून सरकारला विरोधक घेरणार

ऑफिस सुटल्यानंतर 'नो कॉल, नो ई-मेल'; राइट टू डिस्कनेक्ट' विधेयक लोकसभेत सादर

Mumbai : आंबेडकर स्मारक २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही