लाईफस्टाईल

Dhanteras 2025 : १८ की १९ ऑक्टोबर? नेमकी कधी आहे धनत्रयोदशी? सोनं खरेदी करण्याची 'ही' वेळ चुकवू नका!

यावर्षी त्रयोदशीची तिथी दोन दिवसांवर आल्याने थोडा गोंधळ दिसतो. म्हणूनच या लेखात आपण धनतेरसच्या तिथीपासून या दिवशी सोनं खरेदीच्या शुभ मुहूर्तांपर्यंत सर्व गोष्टींची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत...

Mayuri Gawade

दिवाळीच्या आनंदोत्सवाची सुरुवात करणारा पहिला आणि अत्यंत शुभ दिवस म्हणजे धनत्रयोदशी. हिंदू धर्मात धनतेरसला खास महत्त्व आहे. पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी त्रयोदशीची तिथी दोन दिवसांवर आल्याने थोडा गोंधळ दिसतो. म्हणूनच या लेखात आपण धनतेरसच्या तिथीपासून या दिवशी सोनं खरेदीच्या शुभ मुहूर्तांपर्यंत सर्व गोष्टींची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत...

धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी कुबेर देव आणि लक्ष्मीमातेची पूजा केली जाते. सोने, चांदी, भांडी, झाडू, वाहने, तसेच गणेश-लक्ष्मीच्या मूर्तींची खरेदी या दिवशी शुभ मानली जाते. या दिवसापासून दिवाळीचा पाच दिवसांचा सण – धनतेरस, नरक चतुर्दशी, दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज, असा उत्सव सुरू होतो. धार्मिक मान्यतेनुसार, देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांचा जन्म हाच दिवस असल्याने याला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

कधी आहे धनत्रयोदशी?

हिंदू पंचांगानुसार यंदा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी १८ ऑक्टोबर, शनिवार दुपारी १२:१८ वाजता सुरू होऊन १९ ऑक्टोबर, रविवार दुपारी १:५१ वाजेपर्यंत राहणार आहे. प्रदोषकाळ १८ ऑक्टोबरला येत असल्यामुळे याच दिवशी धनतेरस साजरी केली जाणार आहे.

शुभ योग

या वर्षीच्या धनत्रयोदशी दिवशी अनेक शुभ योग आहेत. या दिवशी ब्रह्मयोग, उत्तराफाल्गुनी आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्र, तसेच बुधादित्य आणि कलात्मक योग निर्माण होणार आहेत. १८ ऑक्टोबर रोजी पहाटे १:४८ वाजेपासून दुपारी १:४१ वाजेपर्यंत ब्रह्मयोग राहील. त्याचबरोबर पूर्वाफाल्गुनी नक्षत्र सकाळी ३:४१ वाजेपर्यंत सुरू राहील, आणि त्यानंतर उत्तराफाल्गुनी नक्षत्र आरंभ होईल.

धनत्रयोदशी २०२५ सोने-चांदी खरेदीची शुभ वेळ:

धनतेरसच्या दिवशी सोने-चांदी खरेदीसाठी दोन विशेष शुभ मुहूर्त असतील. पहिला शुभ काळ १८ ऑक्टोबर दुपारी १२:१८ ते १९ ऑक्टोबर सकाळी ६:२६ पर्यंत राहील. तर दुसरा शुभ काळ १९ ऑक्टोबर सकाळी ६:२६ ते दुपारी १:५१ या वेळेत असेल. या दोन्ही काळात खरेदी केल्यास ती अत्यंत मंगल आणि फलदायी मानली जाते.

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

डिसेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, १ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: १९ नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती; बारामती, अंबरनाथमध्ये पुन्हा गोंधळ

मुंबईच्या नावासाठी उद्धव ठाकरे कडाडले, 'जिथे-जिथे बॉम्बे लिहलंय तिथे...