लाईफस्टाईल

Diwali Special : दिवाळीच्या साफसफाईत किचनला द्या प्राधान्य! स्वच्छ व चमकदार स्वयंपाकघरासाठी सोप्या टिप्स

दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते घराची झळाळी! सजावट, फुलं, दिवे यांच्याइतकीच महत्त्वाची आहे किचनची स्वच्छता. कारण स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं. रोजचं स्वयंपाक, तेल-तूप, मसाले यामुळे इथे सर्वाधिक घाण साचते. तर चला जाणून घेऊया, किचन चमकदार ठेवण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय!

नेहा जाधव - तांबे

दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते घराची झळाळी! सजावट, फुलं, दिवे यांच्याइतकीच महत्त्वाची आहे किचनची स्वच्छता. कारण स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं. रोजचं स्वयंपाक, तेल-तूप, मसाले यामुळे इथे सर्वाधिक घाण साचते. तर चला जाणून घेऊया, किचन चमकदार ठेवण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय!

१. डायनिंग टेबलला सुगंधासह चमक द्या

दररोजच्या जेवणामुळे डायनिंग टेबलवर डाग, तेलकटपणा आणि दुर्गंधी निर्माण होते. त्यासाठी कोमट पाण्यात नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाका. या मिश्रणाने टेबल पुसा. त्यामुळे दुर्गंधी नाहीशी होते आणि नैसर्गिक चमक येते. लाकडी टेबल असल्यास थोडं व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून पुसल्यास सुंदर ग्लॉस येतो.

२. फ्रीजला द्या ताजेपणा

फ्रीजमधून कधी कधी वास येतो आणि आत धूळ व तेलकट थर दिसतात. फ्रीजमधील सर्व पदार्थ बाहेर काढा. उकडलेल्या बटाट्यांच्या सालींनी आतून पुसा. हे नैसर्गिक डाग काढण्याचे उत्तम साधन आहे! शेवटी लिंबाच्या रसात भिजवलेल्या कपड्याने पुन्हा एकदा स्वच्छ पुसा, त्यामुळे फ्रीज ताजातवाना आणि सुगंधी राहतो.

३. किचनमधील नळ व सिंक करा चकचकीत

तेलकट पाण्यामुळे नळावर डाग पडतात. थोडी टूथपेस्ट नळावर लावून मऊ कापडाने घासा, नंतर गरम पाण्याने धुवा. स्टील सिंकसाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र करून वापरा. त्यामुळे सर्व डाग आणि गंज दूर होतील.

४. मिक्सर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची देखभाल

मिक्सर, टोस्टर किंवा ब्लेंडर वापरून झाल्यावर लगेच पुसून ठेवा. उपकरणांवर धूळ बसू नये म्हणून कापडी कव्हर घालून ठेवा. मिक्सरच्या जारमध्ये लिंबाच्या साली आणि पाणी फिरवा. त्यामुळे वास व तेलकटपणा नाहीसा होतो.

५. कचऱ्याच्या डब्याची स्वच्छता अत्यावश्यक

किचनमधील सर्वाधिक जीवाणू जमा होतात ते कचऱ्याच्या डब्याजवळ. दररोज फिनेल किंवा डिटर्जंट पाण्याने ती जागा स्वच्छ करा. नेहमी झाकण असलेला डबा वापरा आणि आतमध्ये बेकिंग सोडा टाका, त्यामुळे दुर्गंधी येत नाही.

६. स्टोव्ह व गॅस टॉप नैसर्गिकरीत्या स्वच्छ करा

संत्र्याच्या सालींनी किंवा लिंबाच्या रसाने स्टोव्ह पुसा. त्यामुळे डाग दूर होतात आणि वासही कमी होतो. शेवटी कोरड्या कपड्याने पुसल्यावर गॅस टॉप चमकदार दिसतो.

७. हवेशीर आणि सुगंधी किचनसाठी टिप्स

किचनमध्ये दररोज अगदी थोडं नीलगिरी तेल किंवा लिंबू पाणी फवारल्यास किटक व दुर्गंधी दूर राहतात. संध्याकाळी अगरबत्ती किंवा नैसर्गिक सुगंधी मेणबत्ती लावल्यास वातावरण प्रसन्न वाटतं.

दिवाळीच्या साफसफाईत किचनला प्राधान्य द्या. कारण इथेच 'अन्न' तयार होतं आणि घरात आनंद पसरतो. हे सर्व उपाय घरगुती, स्वस्त आणि रासायनिक मुक्त आहेत. स्वच्छ किचन म्हणजे आरोग्यदायी आणि आनंदी घर!

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर