लाईफस्टाईल

दुपारच्या वेळी तुम्हालाही झोप येते? 'ही' आहेत ६ कारणं

अनेकांना दुपारच्या वेळी झोप येते. पण यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?

Suraj Sakunde
कोणत्याही व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी दररोज साधारणपणे ७ ते ८ तासांची झोप घेणं आवश्यक असतं.
बहुतेक लोक रात्री पूर्ण झोप घेतात. परंतु काही लोक असेही असतात, ज्यांना दुपारच्या वेळी जास्त झोप येते.
दुपारच्या वेळी झोप येण्यामागं अनेक कारणं असू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारणांबद्दल सांगणार आहोत.
बऱ्याचदा आपण दुपारी गरजेपेक्षा जास्त जेवण करतो. त्याला ओव्हरडायटिंग असं म्हणतात. त्यामुळं दुपारी झोप येते.
दुपारच्या जेवणात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेटचा समावेश असल्यास झोप येऊ शकते.
रात्रीच्या वेळी झोप पूर्ण न झाल्यानं दुपारी झोप येऊ शकते.
दुपारच्या वेळी जेवण केल्यानंतर त्याचं पचन होण्यासाठी शरीरातील ऊर्जा खर्च होत असते.
अशा परिस्थितीत मेंदूला रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळंही झोप येऊ शकते.
रक्ताची कमतरता, डायबिटीज इत्यादी आजारांमुळंही चांगली झोप येऊ शकते.
जर शारीरिक मेहनतीचं काम जास्त केलं असेल, तरीही दुपारी झोप येऊ शकते.

पहिल्याच दिवशी आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा; विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

Goa Nightclub Fire : नाइट क्लबचे दोन्ही मालक थायलंडला पसार

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन; वंचित आणि कष्टकऱ्यांचा आवाज हरपला

‘वंदे मातरम’वर चर्चेची गरजच काय? प्रियांका गांधी यांचा लोकसभेत सवाल

'वंदे मातरम'वरून गोंधळ; काँग्रेसने ‘वंदे मातरम’चे तुकडे केले - मोदी