लाईफस्टाईल

फक्त कांदा, ब्रेड आणि चीज... ५ मिनिटांत तयार होईल खमंग तवा सॅण्डविच; पावसाळ्यात नक्की ट्राय करा

फक्त कांदा, ब्रेड, चीज आणि काही मसाल्यांच्या मदतीने ५ मिनिटांत तयार करा कुरकुरीत तवा सॅण्डविच. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी ही सोपी आणि झटपट रेसिपी जाणून घ्या.

Mayuri Gawade

पावसाळ्यात गरमागरम चहा आणि त्यासोबत कुरकुरीत काहीतरी खाण्याची इच्छा हमखास होते. मात्र, रोज वेगवेगळ्या भाज्या चिरून नाश्ता बनवण्यासाठी वेळ मिळेलच असं नाही. अशा वेळी फक्त कांदा, ब्रेड आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या काही साहित्याच्या मदतीने झटपट तयार होणारे तवा सॅण्डविच हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ चवीला खमंग आणि पोटभर असल्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबतही मस्त लागतो.

लागणारे साहित्य

  • ४ ब्रेड स्लाइस

  • २ मध्यम आकाराचे कांदे (पातळ चिरलेले)

  • २ टेबलस्पून बटर

  • ½ कप किसलेले चीज

  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • ३ ते ४ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या)

  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

  • ½ टीस्पून काळी मिरी पूड

  • ½ टीस्पून चिली फ्लेक्स

  • ½ टीस्पून ओरेगॅनो

  • चवीनुसार मीठ

कृती

१. कांद्याचे मिश्रण तयार करा

कढईत बटर गरम करून त्यात पातळ चिरलेला कांदा घाला. कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण घालून कांदा सोनेरी व सुगंधी होईपर्यंत शिजवा.

२. मसाले मिसळा

आता त्यात काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व साहित्य एकजीव करा. गॅस बंद करून मिश्रण थोडं थंड होऊ द्या.

३. सॅण्डविच तयार करा

ब्रेडच्या एका स्लाइसला बटर लावा. त्यावर तयार कांद्याचे मिश्रण समान पसरवा. त्यावर किसलेले चीज घालून दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा. बाहेरील बाजूला पुन्हा थोडे बटर लावा.

४. तव्यावर खरपूस भाजा

गरम तव्यावर सॅण्डविच दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम सॉस, हिरवी चटणी किंवा चहासोबत सर्व्ह करा.

काही टिप्स

  • अधिक पौष्टिक बनवण्यासाठी स्वीटकॉर्न किंवा शिमला मिरचीही घालू शकता.

  • तिखट आवडत असल्यास चिली फ्लेक्सचे प्रमाण वाढवा.

  • मोझरेला किंवा प्रोसेस्ड चीज वापरल्यास सॅण्डविच अधिक चविष्ट लागते.

कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; आतापर्यंत १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना लाभ

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात, Video

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड

Pune : दोन महिला पोलिस करणार होत्या समलैंगिक विवाह; आळंदीत लग्नाची तयारी, पत्रिकाही छापल्या, पण आता विवाह रद्द