Freepik
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात कोशिंबीर खाण्याचे आरोग्याला होतात मोठे फायदे

कोशिंबीर हा भारतीय खाद्य परंपरेतील खास पदार्थ आहे. यामध्ये आरोग्य उत्तम कसे राखता येईल याचा खूप बारकाईने विचार केला आहे. कोशिंबीर ही जास्त करून कच्च्या फळभाज्यांपासून केली जाते. काकडीची कोशिंबीर सर्वात जास्त खाल्ली जाते. तसेच टोमॅटो कोशिंबीर, मुळा कोशिंबीर या अन्य फळभाज्यांपासूनही कोशिंबीर करता येते.

Kkhushi Niramish

कोशिंबीर हा भारतीय खाद्य परंपरेतील खास पदार्थ आहे. यामध्ये आरोग्य उत्तम कसे राखता येईल याचा खूप बारकाईने विचार केला आहे. कोशिंबीर ही जास्त करून कच्च्या फळभाज्यांपासून केली जाते. काकडीची कोशिंबीर सर्वात जास्त खाल्ली जाते. तसेच टोमॅटो कोशिंबीर, मुळा कोशिंबीर या अन्य फळभाज्यांपासूनही कोशिंबीर करता येते. तसे पाहता सर्व ऋतूंमध्ये कोशिंबीर खाण्याचे आरोग्याला लाभ होतात. मात्र, उन्हाळ्यात कोशिंबीर खाण्याचे आरोग्याला अधिक फायदे होतात.

कोशिंबीर खाण्याचे फायदे

भूक चांगली लागते

कोशिंबीरमध्ये सॅलडचा प्रयोग जास्त असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात फायबर आणि जीवनसत्त्वे मिळते. सकाळी कोशिंबीर खाल्ल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. यामुळे चांगली भूक लागते.

दह्यामुळे Vitamin B12 चे लाभ

कोशिंबीर ही मुख्यत्वे करून दह्यात केली जाते. दही हा Vitamin B12 चा मुख्य स्रोत आहे. शरीरांच्या स्नायुंच्या बळकडींसाठी Vitamin B12 आवश्यक असते. यामुळे हाडांशी संबंधित आजार दूर होतात. तर Vitamin B12 च्या कमतरतेमुळे सांधे दुखणे, गुडखे दुखणे, पाय दुखणे असे त्रास संभवतात. त्यामुळे नियमितपणे आहारात कोशिंबीरीचा समावेश केल्याने Vitamin B12 ची उणीव भरून काढता येते.

शरीर हायड्रेट राहते

काकडीची कोशिंबीर, टोमॅटोची कोशिंबीर खाल्ल्याने शरीर डिहायड्रेट होत नाही. कारण कोशिंबिरीतील फळवर्गीय भाज्यांमुळे शरीरात पाण्याची पातळी राखण्यास मदत होते. त्यामुळे शरीर कायम हायड्रेट राहते.

रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते

फळभाज्यांमुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढीस लागते. शरीराला पोषक तत्वे मिळतात.

याशिवाय उन्हाळ्यात कोशिंबीर खाल्ल्याने शरीराला नैसर्गिकरित्या गारवा मिळतो. जेवणासोबत कोशिंबीर खाल्ल्याने पचन क्रिया व्यवस्थित होते. अन्नाचे पचन योग्य झाल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

मुंबई, उपनगरात ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; ५ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी आता ८ सप्टेंबरला

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार