लाईफस्टाईल

नैसर्गिकरित्या घालवा चेहऱ्यावरचे डाग, खड्डे; 'हे' करा घरगुती उपाय

तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी तुम्ही काही घरगुती टिप्स वापरू शकता. त्यासाठी कश्या प्रकारे काळजी घेता येऊ शकते ते जाणून घेऊया

Rutuja Karpe

महागड्या प्रॉडक्टचा वापर करून सुद्धा चेहऱ्यावरचे मुरूम, खड्डे दूर होत नाहीयेत ना? चेहऱ्यावरचे डाग कमी होण्यासाठी काही घरगुती पद्धतींचा वापर केल्याने चेहऱ्यासाठी ते लाभकारक ठरू शकते. तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी तुम्ही काही घरगुती टिप्स वापरू शकता. त्यासाठी कश्या प्रकारे काळजी घेता येऊ शकते ते जाणून घेऊया ….

मुलतानी माती-

आपल्या घरात असलेल्या मुलतानी मातीचा वापर सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी केला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये समप्रमाणात लिंबाचा रस आणि गुलाबपाणी याचे मिश्रण एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण  आपल्या चेहऱ्यावर लावले जावे. हे कमीत कमी अर्धा तास आपल्या चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर थोड्या प्रमाणात सुकल्यानंतर थंड पाण्याच्या साह्याने आपल्या चेहऱ्यावरची मुलतानी माती काढून टाका . त्याने तुमच्या त्वचेवरचे डाग काही दिवसांत कमी कमी होत जातील.

कोरफडीचा रस-झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफडीचा रस लावा. हा गर सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. तसेच चेहऱ्यावरचे डाग दूर करण्यासाठी आपल्या आजूबाजूला असलेल्या कडुलिंबाच्या पानाचा वापर हा आपल्या चेहऱ्यासाठी केला जावा.

पिंपल्स फोडणे-

अनेकांना सवय असते कि,पिंपल्स आला कि तो ते फोडतात. आलेला पिंपल्स आपण जर फोडला तर मात्र आपल्या चेहऱ्यावर डाग ते तसेच राहतात. त्यामुळे आलेल्या पिंपल्स फोडल्या जाऊ नयेत.

तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा-

आपल्या आहारात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचा वापर हा जास्त प्रमाणात केला नाही पाहिजे. तसेच आहारात पालेभाज्या यांचा समावेश हा जास्त असला पाहिजे. त्याच्यामध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते . त्यामुळे  पोटाच्या समस्या या दूर होऊ शकतात.  पोट जर व्यवस्थित साफ झाले तर  तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या पिंपल्स येत  नाहीत.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

भायखळा विधानसभा : दोन सेनेत चुरशीची लढत; एका जागेसाठी दावेदार मात्र अनेक, २ लाख ५७ हजार मतदारांचा कौल कोणाला?

घाटकोपर पूर्व : नवकोट नारायणाचा कोट भेदण्याचे आव्हान; भाजपच्या पराग शहा यांच्याशी मविआच्या राखी जाधव यांचा मुकाबला

माझ्या जीवाला धोका - मिहीर कोटेचा; भाजप आमदाराचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र

एक पुरावा आणा, मतदान करा! राज्य निवडणूक आयोगाचे मतदारांना ID बाबत आवाहन; आधार, DL ग्राह्य धरता येणार

तीन दशकात शिवसेनेची भाजप झाली नाही, तर काँग्रेस कशी होईल – उद्धव ठाकरे