PF खात्यात किती पैसे जमा आहेत? आता WhatsApp वर फक्त Hi पाठवा अन् A टू Z माहिती मिळवा; जाणून घ्या सोपी पद्धत 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

PF खात्यात किती पैसे जमा आहेत? आता WhatsApp वर फक्त Hi पाठवा अन् A टू Z माहिती मिळवा; जाणून घ्या सोपी पद्धत

EPFO WhatsApp Service : पीएफ खात्यातील बॅलन्स, शेवटचे ५ व्यवहार आणि पासबुकची माहिती आता WhatsApp वर मिळवा. EPFO च्या क्रमांकावर फक्त 'Hi' पाठवा. ही सुविधा कशी वापरायची, जाणून घ्या.

Mayuri Gawade

नोकरी करणाऱ्या अनेकांच्या पगारातून दर महिन्याला पीएफचे पैसे कापले जातात. मात्र, आपल्या पीएफ खात्यात आतापर्यंत किती पैसे जमा झाले, कंपनीकडून दर महिन्याला पैसे जमा होत आहेत का किंवा शेवटचे व्यवहार कोणते झाले, हे अनेकांना पटकन समजत नाही. त्यासाठी वेबसाइटवर जाऊन लॉगिन करण्याची कटकटही असते. पण आता ही माहिती मिळवणं सोपं झालं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) व्हॉट्सॲपवर नवी सेवा सुरू केली आहे. यामुळे आता केवळ 'Hi' असा मेसेज पाठवून पीएफ बॅलन्स, शेवटचे ५ व्यवहार आणि पासबुकची माहिती मिळवता येणार आहे.

अवघ्या १४ दिवसांत लाखो जणांचा प्रतिसाद

ईपीएफओच्या नव्या व्हॉट्सॲप सेवेला खातेदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ईपीएफओने एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या १४ दिवसांत ८९.८८ लाख सदस्यांनी या सुविधेचा वापर करून आपल्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासली आहे. ही सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.

WhatsApp वर कोणत्या सुविधा मिळणार?

ईपीएफओच्या या सेवेच्या माध्यमातून खातेदारांना पीएफशी संबंधित तीन महत्त्वाच्या सुविधा मिळणार आहेत. यामध्ये खात्यातील शिल्लक रक्कम तपासणं, शेवटच्या ५ व्यवहारांची माहिती पाहणं आणि पीएफ पासबुक डाउनलोड करणं यांचा समावेश आहे. त्यामुळे पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली आहे आणि अलीकडे कोणते व्यवहार झाले आहेत, याची माहिती मोबाईलवरच मिळवता येईल.

WhatsApp वर PF खात्याची माहिती कशी मिळवाल?

१. सर्वप्रथम ईपीएफओचा व्हॉट्सॲप क्रमांक +९१ ८७९६४४१८०० (+91 8796441800) मोबाईलमध्ये सेव्ह करा.

२. त्यानंतर व्हॉट्सॲप उघडून या क्रमांकावर 'Hi' असा मेसेज पाठवा.

३. पुढे दिलेल्या पर्यायांमधून आपली भाषा निवडा आणि आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.

४. यासाठी व्हॉट्सॲपवर वापरला जाणारा मोबाईल क्रमांक तुमच्या UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) शी जोडलेला असणं आवश्यक आहे.

५. पडताळणीनंतर PF Balance, Last 5 Transactions आणि Passbook Download असे पर्याय दिसतील.

६. तुम्हाला हवी असलेली सेवा निवडल्यानंतर संबंधित माहिती मिळेल.

QR कोडद्वारेही वापरता येणार सेवा

ईपीएफओने या सेवेसाठी QR कोडची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. ईपीएफओने प्रसिद्ध केलेला अधिकृत QR कोड स्कॅन करून व्हॉट्सॲप सेवा सुरू करता येईल. त्यानंतर 'Hi' पाठवून आवश्यक पर्याय निवडता येतील.

दरम्यान, पीएफ खात्याची माहिती मिळवताना केवळ ईपीएफओच्या अधिकृत क्रमांकाचाच वापर करावा. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसेच कोणालाही आपला UAN पासवर्ड किंवा OTP सांगू नये.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : दाऊद इब्राहिमच्या जुन्या घरावर अखेर हातोडा; भेंडी बाजारात BMC ची तोडक कारवाई सुरू; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

ठाकरेंचा निर्णय वैचारिक फारकत घेणारा; मविआ सरकार स्थापनेबाबत शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Mumbai : मालवाहतुकीत ११ टक्क्यांची वाढ; ४,८०९ कोटींचे उत्पन्न

Mumbai : कॅफे आयडियल, चेतनासह नऊ रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित; FDA ची मोठी कारवाई

Mumbai : दादर रेल्वे स्थानक लवकरच 'चैत्यभूमी'; नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार - मुख्यमंत्री