फ्रिजवर कव्हर घालता? मग ही बातमी एकदा नक्की वाचा; कंपन्या का देतात 'नो कव्हर'चा सल्ला? 
लाईफस्टाईल

फ्रिजवर कव्हर घालता? मग ही बातमी एकदा नक्की वाचा; कंपन्या का देतात 'नो कव्हर'चा सल्ला?

फ्रिजवर कव्हर घातल्याने कम्प्रेसरवर ताण वाढू शकतो, वीज बिल वाढू शकतं आणि फ्रिजचं आयुष्य कमी होऊ शकतं. यामागचं कारण जाणून घ्या.

Mayuri Gawade

घरात नवीन फ्रिज आला की त्यावर सुंदर कव्हर घालणं ही अनेकांची सवय असते. धूळ बसू नये, ओरखडे पडू नयेत आणि फ्रिज अधिक आकर्षक दिसावा, यासाठी लोक कव्हर वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का? हीच सवय तुमच्या महागड्या फ्रिजचं आयुष्य कमी करू शकते. म्हणूनच अनेक मोठ्या होम अप्लायन्स कंपन्या फ्रिजवर कव्हर न घालण्याचा सल्ला देतात.

फ्रिजवर कव्हर का घालू नये?

फ्रिजचं मुख्य काम म्हणजे आतलं अन्नपदार्थ थंड ठेवणं. हे करताना फ्रिजच्या आत तयार होणारी उष्णता बाहेर सोडली जाते. जुन्या फ्रिजमध्ये ही उष्णता मागील बाजूला असलेल्या कॉइलमधून बाहेर पडायची. मात्र, आता बहुतेक आधुनिक फ्रिजमध्ये या कॉइल बाजूच्या किंवा वरच्या भागात बसवलेल्या असतात.

अशावेळी तुम्ही फ्रिजवर जाड कापड किंवा प्लास्टिकचं कव्हर घातलं, तर ही उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे फ्रिजच्या आत उष्णता अडकून राहते.

कम्प्रेसरवर वाढतो ताण

उष्णता बाहेर न पडल्यामुळे फ्रिजचा कम्प्रेसर योग्य तापमान राखण्यासाठी जास्त वेळ आणि जास्त क्षमतेने काम करतो. त्यामुळे तो गरम होऊ लागतो. दीर्घकाळ असं होत राहिल्यास फ्रिजची कूलिंग कमी होऊ शकते आणि कम्प्रेसर खराब होण्याचा धोका वाढतो.

विशेष म्हणजे, कम्प्रेसर हा फ्रिजमधील सर्वात महागडा भाग मानला जातो. तो खराब झाल्यास दुरुस्तीसाठी किंवा बदलण्यासाठी मोठा खर्च करावा लागू शकतो.

वीज बिलही वाढू शकतं

कम्प्रेसरवर सतत अतिरिक्त ताण येत असल्यामुळे फ्रिज अधिक वीज वापरू लागतो. परिणामी महिन्याचं वीज बिलही वाढू शकतं. याशिवाय कव्हरमुळे तयार होणाऱ्या ओलाव्यामुळे फ्रिजच्या बाहेरील धातूच्या भागाला गंज लागू शकतो.

मग काय करावं?

तज्ज्ञांच्या मते, फ्रिजभोवती हवा खेळती राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे फ्रिजवर जाड कव्हर टाकण्याऐवजी तो नियमित स्वच्छ ठेवणं आणि त्याच्या आजूबाजूला पुरेशी जागा ठेवणं अधिक योग्य ठरतं. त्यामुळे फ्रिजची कूलिंग व्यवस्थित राहते, वीजेची बचत होते आणि उपकरणाचं आयुष्यही वाढतं.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली