विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे आगमन यंदा २७ ऑगस्टला होणार असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे. ढोल-ताशांचा गजर, फुलांची आरास, मोदकांचा गोड सुगंध यामुळे घराघरांत मंगलमय वातावारण निर्माण झालंय. बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक सज्ज झाले असून, भक्तिभावाने आरत्या, पूजाअर्चा आणि आरास यांची तयारी सुरू आहे.
या पवित्र सणानिमित्त आपल्या परिवाराला, मित्रमंडळींना आणि जिवलगांना खास गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा संदेश आणि सुंदर कोट्स पाठवा, तसेच WhatsApp आणि Facebook वर बाप्पाचे खास स्टेटस शेअर करून आनंद साजरा करा.
गणनायकाच्या या आगमनाने,
भक्तिभाव दाटे अंतःकरणामध्ये,
प्रेम, शांती, सौख्य लाभो,
बाप्पा तुझ्या कृपेने जीवन फुलो!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
..................
सर्व मांगल्य मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखाची बरसात व्हावी,
मनोकामना पूर्ण व्हावी,
गणपतीच्या चरणी ठेवू या अर्पण,
आशीर्वादाने होवो जीवन मंगलमय!
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
..................
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची आरास
गणपती बाप्पा मोरया...
मोरया मोरया गोड हे नाम तुझे
कृपा सागरा हेची माहेर माझे
तुझी सोंड बा वाकुडी एकदंता
मला बुद्धी दे मोरया गुणवंता
सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा!
..................
वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
रम्य ते रूप सगुण साकार
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!