Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा सुगंधी केसर मोदक; आताच नोट करा सोपी रेसिपी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा सुगंधी केसर मोदक; आताच नोट करा सोपी रेसिपी

केशरी रंग, केशराचा सुगंध आणि मऊसर पोत यामुळे हे मोदक चवीला तर अप्रतिम लागतातच, शिवाय बाप्पाच्या नैवेद्याची शोभाही वाढवतात.

किशोरी घायवट-उबाळे

गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाच्या आवडीच्या मोदकाला विशेष महत्त्व असतं. उकडीचे मोदक, तळलेले मोदक यांसोबतच यंदा घरच्या घरी केसर मोदक बनवून पाहा. केशरी रंग, केशराचा सुगंध आणि मऊसर पोत यामुळे हे मोदक चवीला तर अप्रतिम लागतातच, शिवाय बाप्पाच्या नैवेद्याची शोभाही वाढवतात. विशेष म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक तयार करता येतात.

साहित्य :

  • १ कप मावा

  • १/२ कप पिठीसाखर

  • ८ ते १० केशराच्या काड्या

  • २ चमचे कोमट दूध

  • १/२ चमचा वेलची पूड

  • १ चमचा तूप

  • काजू-बदामाचे काप

  • मोदकाच्या साच्याला लावण्यासाठी थोडे तूप

केसर मोदक कसे बनवायचे?

१. केशर तयार करा : सर्वप्रथम केशराच्या काड्या कोमट दुधात १० ते १५ मिनिटे भिजत ठेवा. त्यामुळे दुधाला केशराचा सुंदर रंग आणि सुगंध येईल.

२. मावा भाजून घ्या : कढईत एक चमचा तूप गरम करून त्यात मावा घाला. मंद आचेवर मावा हलका गरम होईपर्यंत सतत ढवळत राहा. मावा जास्त भाजू नका.

३. साखर आणि केशर घाला : गॅस बंद करून मावा थोडा कोमट होऊ द्या. त्यानंतर त्यात पिठीसाखर, केशराचे दूध आणि वेलची पूड घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या.

४. मिश्रण थंड होऊ द्या : मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्याला मऊसर गोळ्याचा आकार द्या. मिश्रण खूप चिकट वाटत असल्यास काही वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता.

५. मोदकाचा आकार द्या : मोदकाच्या साच्याला हलके तूप लावा. त्यात तयार मिश्रण भरून व्यवस्थित दाबा. साचा उघडल्यानंतर मोदक अलगद बाहेर काढा.

६. सजावट करा : तयार केसर मोदकावर काजू-बदामाचे काप किंवा केशराच्या काड्यांनी सजावट करा. बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी स्वादिष्ट केसर मोदक तयार आहेत.

केसर मोदक बनवताना लक्षात ठेवा

  • मावा भाजताना गॅसची आच मंद ठेवा, अन्यथा मावा जळू शकतो.

  • पिठीसाखर मावा थोडा थंड झाल्यानंतरच घाला.

  • केशर कोमट दुधात भिजवल्याने त्याचा रंग आणि सुगंध अधिक चांगला खुलतो.

  • मोदकाचे मिश्रण खूप गरम असताना साच्यात भरू नका.

  • मोदक साच्यातून सहज बाहेर यावा यासाठी साच्याला हलके तूप लावणे महत्त्वाचे आहे.

  • तयार मोदक हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये साठवता येतात.

  • चव अधिक समृद्ध करण्यासाठी मिश्रणात बारीक चिरलेले काजू-बदामही घालू शकता.

बाप्पाच्या नैवेद्यासाठी यंदा नेहमीच्या मोदकांपेक्षा काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल, तर सुगंधी आणि स्वादिष्ट केसर मोदक नक्की बनवून पाहा.

Mumbai : एफडीएने ४३ परवाने केले निलंबित; १७.८ टन साठा केला जप्त, दिवाळीत FDA ची मोठी कारवाई

दिवाळीच्या मुहूर्तावर कतरिना-विकीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा! छोट्या विहानच्या गोड फोटोने वेधलं लक्ष

Mumbai : पावसासंबंधी माहिती वॉलवर; मुख्यालयासह परळ येथील नियंत्रण कक्ष होणार हायटेक

Mumbai : स्थायी समितीत जोरदार आतषबाजी; आधी खर्च, नंतर मंजुरी; स्थायी समितीत ५ ते ७५ लाखांचे ९० टक्के प्रस्ताव

Mumbai : केईएमचा ४२२ कोटींचा शैक्षणिक संकुल प्रकल्प; BMC डिसेंबरमध्ये काढणार निविदा