'खाईन तर तुपाशी!' पण रोज किती तूप खावे? तज्ज्ञांनी सांगितले योग्य प्रमाण  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

खाईन तर तुपाशी! पण रोज किती तूप खावे? तज्ज्ञांनी सांगितले योग्य प्रमाण

वजन कमी करायचे असेल तर तूप पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे का? तज्ज्ञांच्या मते तसे नाही. साजूक तूप योग्य प्रमाणात खाल्ल्यास ते शरीराला ऊर्जा देण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. मात्र त्यातील फॅट आणि कॅलरीज लक्षात घेता दररोज किती तूप खावे, याबाबत तज्ज्ञांनी योग्य प्रमाण सांगितले आहे.

Mayuri Gawade

'खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी' ही म्हण अनेकांच्या तोंडी असली तरी वजन कमी करण्याचा विचार करताच बहुतांश लोक सर्वप्रथम आहारातून तूप पूर्णपणे बंद करतात. तूप खाल्ल्याने वजन वाढते, असा समज अनेकांच्या मनात असतो. मात्र तज्ज्ञांच्या मते, तूप पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. योग्य प्रमाणात साजूक तूप आहारात समाविष्ट केल्यास ते शरीराला ऊर्जा देण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यासही मदत करू शकते.

आरोग्य डाएट अँड न्यूट्रिशन क्लिनिकच्या डाएटिशियन डॉ. सुगीता मुटरेजा यांच्या मते, साजूक तूपामध्ये हेल्दी फॅट्ससोबतच व्हिटॅमिन A, D, E आणि K यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. मर्यादित प्रमाणात तूप खाल्ल्यास शरीराला ताकद मिळते आणि पचनसंस्था मजबूत राहण्यास मदत होते. मात्र तूपामध्ये फॅट आणि कॅलरीज जास्त असल्यामुळे त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

एका दिवसात किती तूप खावे?

तज्ज्ञांच्या मते, एका निरोगी व्यक्तीने दररोज १ ते २ चमचे साजूक तूप आहारात घेणे योग्य ठरते. यापेक्षा जास्त प्रमाणात तूप घेतल्यास शरीरातील कॅलरीज वाढू शकतात, ज्यामुळे वजन वाढण्याची किंवा हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात तूप खाणेच फायदेशीर ठरते.

डाळ, वरण किंवा भाजीमध्ये तूप

डाळ, वरण किंवा भाजीमध्ये थोडे साजूक तूप घालून खाल्ल्यास अन्नाची चव वाढते आणि पचन सुधारण्यास मदत होते. अनेकांना अशा प्रकारे तूप खाणे सोपे आणि पौष्टिक वाटते.

चपाती किंवा पराठ्यावर तूप

गरम चपाती / रोटी किंवा पराठ्यावर थोडे तूप लावून खाल्ल्यास ते अधिक मऊ आणि चविष्ट लागते. मात्र यावेळी तुपाचे प्रमाण कमी ठेवणे आवश्यक आहे.

दूध किंवा कॉफीसोबत तूप

काही लोक दूध किंवा कॉफीमध्ये थोडे तूप मिसळून घेतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर उत्साही वाटण्यास मदत होऊ शकते.

स्वयंपाकात तेलाऐवजी तूप

काही पदार्थ बनवताना कुकिंग ऑइलच्या ऐवजी मर्यादित प्रमाणात तूप वापरले तरी चालते. त्यामुळे अन्न अधिक चविष्ट बनते आणि शरीराला आवश्यक फॅट्सही मिळतात.

सूप किंवा खिचडीमध्ये तूप

विशेषतः थंडीत सूप किंवा खिचडीमध्ये थोडे तूप घातल्यास अन्न अधिक पौष्टिक आणि चवदार बनते.

तूप खाताना लक्षात ठेवाव्यात या गोष्टी

  • शक्यतो शुद्ध देशी गाईचे तूप वापरावे

  • जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळावेत

  • संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक

  • हाय कोलेस्ट्रॉल, बीपी किंवा हृदयविकार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारासोबत साजूक तूप खाल्ल्यास ते शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र तूपाचे प्रमाण जास्त झाल्यास कॅलरीज वाढून वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दररोज १ ते २ चमचे तूप आहारात समाविष्ट करणे हे आरोग्यासाठी योग्य मानले जाते.

(Disclaimer : या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले हे केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची नवशक्ति पुष्टी करत नाही.)

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती