शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. यामुळे हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, स्ट्रोक, डायबिटीस यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.
तज्ज्ञांच्या मते, काही घरगुती उपायांमुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होऊ शकतं. न्यूट्रिशन एक्सपर्टच्या मते, 'आलं' याबाबतीत फायदेशीर ठरू शकतं. आल्यामध्ये ट्रायग्लिसराइड्स आणि लिपोप्रोटीन कमी करणारे गुणधर्म असतात.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आल्याचे सोपे उपाय
कच्चं आलं खा:
तेलकट किंवा जड जेवण झाल्यावर थोडंसं कच्चं आलं खाल्ल्यास कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका कमी होतो.
आल्याचं पाणी:
गरम पाण्यात आल्याचा तुकडा उकळून गाळून घ्या. जेवणानंतर हे पाणी प्यायल्यास पचन सुधारतं आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं.
आल्याची पावडर:
आलं वाळवून त्याची पावडर तयार करा. रोज एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा पावडर टाकून प्यायल्यास बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
आले-लिंबाचा चहा:
दुधाऐवजी आले आणि लिंबाचा चहा प्यायल्यास शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. विशेषतः तेलकट आणि मसालेदार अन्न जास्त खाणाऱ्यांसाठी हा चहा फायदेशीर आहे.
टीप: कोणताही उपाय नियमित सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.