लाईफस्टाईल

Google Birthday : गुगलचं खरं नाव असतं Googol, पण एक चुक झाली अन्...जाणून घ्या गुगलची कहाणी

जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन गुगल आज आपला २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात गुगलने आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनून जवळजवळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची सवय आपल्याला लावली आहे.

नेहा जाधव - तांबे

जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन गुगल आज आपला २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात गुगलने आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनून जवळजवळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची सवय आपल्याला लावली आहे. एका वसतिगृहातून सुरू झालेला हा प्रवास आता जगभर विस्तारला आहे. गुगलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया गुगलची कहाणी.

सुरुवात एका वसतिगृहातून

गुगलची कहाणी १९९५ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात सुरू झाली. लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांची पहिली भेट साधीशी नव्हती, पण पुढच्याच वर्षी त्यांनी मिळून एका नवनवीन सर्च इंजिनवर काम सुरू केलं. सुरुवातीला याला Backrub हे नाव देण्यात आलं होतं. नंतर 'गुगल' हे नाव ठेवलं गेलं, जे 'Googol' या मोठ्या संख्येवरून घेतलेलं आहे.

१९९८ मध्ये सन मायक्रोसिस्टम्सचे सह-संस्थापक अँडी बेचटोल्शेम यांनी दिलेल्या $१ लाखाच्या निधीमुळे गुगलची अधिकृत सुरुवात झाली. कंपनीने आपला वाढदिवस २७ सप्टेंबरलाच साजरा करण्याचा निर्णय घेतला, कारण याच काळात त्यांनी विक्रमी संख्येने वेब पृष्ठे इंडेक्स केल्याचा टप्पा गाठला होता.

नावामागची गंमत

'Googol' म्हणजे १ नंतर १०० शून्ये. ही संकल्पना १९२० मध्ये गणितज्ञ एडवर्ड कासनर यांच्या पुतण्याने मांडली होती. डोमेन नोंदवताना झालेल्या टायपोमुळे 'Googol' ऐवजी 'Google'” असं नाव कायम झालं आणि तेच जगभर गाजलं.

आज गुगल ही Alphabet Inc. ची उपकंपनी आहे. २०१५ मध्ये तयार झालेल्या अल्फाबेटमध्ये गुगलसोबतच वेमो (स्वयंचलित वाहन) आणि व्हेरिली (आरोग्य तंत्रज्ञान) सारखे प्रकल्प आहेत. सध्या गुगल आणि अल्फाबेट या दोन्ही कंपन्यांचं नेतृत्व भारतीय वंशाचे सुंदर पिचाई करत आहेत.

२७ वा वाढदिवस कसा साजरा करणार?

या खास प्रसंगी गुगलने आपल्या होमपेजवर एक रंगीबेरंगी डूडल आणलं आहे, जे १९९८ मधील पहिल्या लोगोची आठवण करून देतं. त्याशिवाय गुगल स्टोअरमध्ये वापरकर्त्यांसाठी विशेष ऑफर्स दिल्या आहेत. BIRTHDAY27 हा कोड वापरून Pixel 9, Pixel Buds Pro 2, Pixel Watch 3 आणि Fitbit Charge 6 यांसारख्या निवडक उत्पादनांवर २० टक्के सूट मिळते. ही ऑफर २८ सप्टेंबरपर्यंत वैध आहे.

गुगलचा प्रवास एका वसतिगृहातील छोट्या कल्पनेपासून ते जगाला माहितीच्या महासागराशी जोडणाऱ्या दिग्गज कंपनीपर्यंत पोहोचला आहे. आजही एखादी शंका पडली की उत्तर एकच मिळतं “फक्त गुगल करा!”

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत