(Photo-@sanjeevkapoor)
लाईफस्टाईल

Gudi Padwa 2026 : सणासुदीला खास गोड पदार्थ; घरच्या घरी तयार करा नारळाचे मोदक

नारळ, सुका मेवा आणि कंडेन्स्ड मिल्क यांची चव एकत्र येऊन हे मोदक अतिशय मऊ आणि स्वादिष्ट बनतात. कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी गुढीपाडव्याच्या सणासाठी नक्की ट्राय करून पाहा.

किशोरी घायवट-उबाळे

गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी घरात गोड पदार्थ बनवण्याची खास परंपरा आहे. पुरणपोळी, श्रीखंड किंवा लाडू यांसोबतच काहीतरी वेगळा गोड पदार्थ बनवायचा असेल तर 'नारळाचे मोदक' हा उत्तम पर्याय ठरू शकतो. नारळ, सुका मेवा आणि कंडेन्स्ड मिल्क यांची चव एकत्र येऊन हे मोदक अतिशय मऊ आणि स्वादिष्ट बनतात. कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी गुढीपाडव्याच्या सणासाठी नक्की ट्राय करून पाहा.

साहित्य :

  • सुके खोबरे (डेसिकेटेड कोकोनट) - २ कप

  • तूप - १ टेबलस्पून

  • चिरलेले काजू - २ टेबलस्पून

  • चिरलेले बदाम - २ टेबलस्पून

  • चिरलेले पिस्ते - २ टेबलस्पून

  • वेलची पूड - १/२ टीस्पून

  • कंडेन्स्ड मिल्क - दीड कप

कृती :

सर्वप्रथम कढईत तूप गरम करून त्यात काजू, बदाम आणि पिस्ते टाका व हलके सोनेरी होईपर्यंत परता. नंतर प्लेटमध्ये काढून ठेवा. त्याच कढईत सुके खोबरे घालून मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे हलके परता. परतलेले खोबरे एका भांड्यात काढून त्यात सुका मेवा आणि वेलची पूड घालून चांगले मिसळा.

आता त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून मिश्रण नीट एकजीव करा. मोदकाच्या साच्याला थोडे तूप लावा आणि त्यात तयार मिश्रण भरून हलके दाबा. साच्यातून मोदक बाहेर काढा आणि सर्व मोदक प्लेटमध्ये सजवून सर्व्ह करा.

टिप्स :

  • मोदक अधिक सुगंधी हवे असतील तर थोडी केशराची पूड किंवा गुलाबपाणी घालू शकता.

  • डेसिकेटेड कोकोनटऐवजी ताजे खोबरेही वापरता येते.

  • मिश्रण खूप सैल वाटत असेल तर थोडे खोबरे घालून ते घट्ट करू शकता.

  • मोदक सुंदर दिसण्यासाठी वरून थोडे पिस्ता किंवा बदामाचे काप घालून सजवा.

Mumbai : एफडीएने ४३ परवाने केले निलंबित; १७.८ टन साठा केला जप्त, दिवाळीत FDA ची मोठी कारवाई

दिवाळीच्या मुहूर्तावर कतरिना-विकीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा! छोट्या विहानच्या गोड फोटोने वेधलं लक्ष

Mumbai : पावसासंबंधी माहिती वॉलवर; मुख्यालयासह परळ येथील नियंत्रण कक्ष होणार हायटेक

Mumbai : स्थायी समितीत जोरदार आतषबाजी; आधी खर्च, नंतर मंजुरी; स्थायी समितीत ५ ते ७५ लाखांचे ९० टक्के प्रस्ताव

Mumbai : केईएमचा ४२२ कोटींचा शैक्षणिक संकुल प्रकल्प; BMC डिसेंबरमध्ये काढणार निविदा