Freepik
लाईफस्टाईल

Gatari Amavasya 2024 Wishes in Marathi: गटारी निमित्त मित्र-परिवारास द्या 'या' हटके शुभेच्छा!

Gatari Amavasya 2024 Wishes: यंदा गटारी अमावस्या ४ ऑगस्टला साजरी होत आहे. गटारी अमावस्येच्या या खास प्रसंगी, तुम्ही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

Tejashree Gaikwad

Gatari Amavasya 2024 Messages: गटारी अमावस्या ही महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते, या दिवशी महाराष्ट्रीयन लोक त्यांच्या घरी मांसाहारी पदार्थ बनवून हा दिवस साजरा करतात. दुसऱ्या दिवसापासून लोक महिनाभर मांसाहार आणि मद्य वर्ज्य करतात. कारण पुढे श्रावण महिना (shravan 2024) सुरु होतो. भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे सर्व शिवभक्त या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात आणि हा महिना सुरू होताच सर्वजण शिवभक्तीत तल्लीन होतात. यंदा ५ ऑगस्ट २०२४ पासून श्रावण महिना सुरू होत आहे. महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवस आधी, गटारी अमावस्या म्हणून साजरी केली जात आहे. यंदा गटारी अमावस्या ४ ऑगस्टला साजरी होत आहे. गटारी अमावस्येच्या या खास प्रसंगी, तुम्ही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश ( Happy Gatari Amavasya 2024 Marathi Shubhechha Sandhesh Wishes, message, status, quotes, WhatsApp Status, Greetings, Facebook Messages) पाठवू शकता.

पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश (Happy Gatari Amavasya 2024)

> मौसम मस्ताना,

सोबत सर्व मित्र परिवार असताना,

साजरी करा गटारी अमावस्या

गटारी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!!

> चमचमीत बोनफायर आणि रुचकर अन्नासह,

आपल्या सुंदर परंपरेसाठी टोस्ट वाढवूया

गटारी अमावस्या मस्त जावो!!

> ही गटारी अमावस्या आगीभोवतीच्या

आनंदी नृत्यासारखी रोमांचक आणि चैतन्यमय होवो

तुम्हाला पुढील काळात खूप खूप शुभेच्छा!

> गरम गरम मटणाचा रस्सा, कोंबडीवडे, मसालेदार पापलेट,

तळलेली सुरमई अशा चमचमीत

मांसाहारी पदार्थांच्या सोबत

जोरात साजरी करू या गटारी गटारी अमावस्येच्या शुभेच्छा!!

> चिमूटभर आनंद, चमचाभर हशा आणि

आशीर्वादांनी भरलेली बादली

गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी