International Friendship Day 2024 Freepik
लाईफस्टाईल

International Friendship Day 2024: आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त आपल्या खास दोस्तांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!

Friendship Day Wishes : आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ३० जुलै रोजी साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो.

Tejashree Gaikwad

Happy International Friendship Day Wishes in Marathi:आंतरराष्ट्रीय मैत्री दिन जुलै महिन्यात साजरा केला जातो. मैत्रीचे महत्त्व ओळखून शांतता, एकता आणि लोक, देश आणि संस्कृती यांच्यातील परस्पर समंजसपणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. मैत्री हे वैयक्तिक आणि सामुदायिक स्तरावर सामाजिक नातेसंबंध मजबूत करणारे बंधन आहे आणि म्हणूनच तो जागतिक स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्रांना शुभेच्छा पाठवू शकता, तसेच फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी स्टेटस सेट (Happy International Friendship Day 2024 Marathi Shubhechha Sandhesh Wishes, message, status, quotes) करू शकता.

पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश

>  मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री – पु. ल. देशपांडे

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा!!

> मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी 
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी

Happy Friendship Day!!

> मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय 
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही.

हॅप्पी फ्रेंडशिप डे!

> वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध,

फुलांचा सुगंध आणि

आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध…

हॅपी फ्रेंडशिप डे!!!

> कुठेच न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे बायको…

माझ्या मैत्रिणीतच मला हे दान मिळालं याचा मला आनंद आहे,

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव