Freepik
लाईफस्टाईल

International Youth Day 2024: आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त पाठवा 'हे' युथफूल शुभेच्छा संदेश!

International Youth Day 2024 Wishes in Marathi: आंतरराष्ट्रीय युवा दिन दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

Tejashree Gaikwad

International Youth Day 2024 Quotes in Marathi: प्रत्येक देशातील तरुण हा महत्त्वपूर्ण असतो. देशातील तरुणांच्या योगदानावर देशाची प्रगती अवलंबून असते. ज्या देशात जास्त तरुण असतात त्या राष्ट्राची उभारणी, विकास आणि प्रगती जास्त उत्तम आणि फास्ट होते असे मानले जाते. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीसाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत तरुणांचा विकास आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित समस्या समजून घेणे आवश्यक आहे. तरुणांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. यासाठीच दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day) दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस तरुणांचा आवाज, कृती आणि प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांच्या विकासाच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. याच न निमित्ताने या खास दिवशी शेअर करू (Happy International Youth Day 2024 Marathi Shubhechha Sandhesh Wishes, message, status, quotes) शकता असे शुभेच्छा संदेश बघा.

पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश (Happy International Youth Day 2024 Marathi)

> उभे रहा, धैर्यवान व्हा, मजबूत व्हा,

सर्व जबाबदारी आपल्या डोक्यावर घ्या,

लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या नशिबाचे निर्माते आहात

युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

( International Youth Day 2024 Wishesh In Marathi: Share These Quotes, Messages, Images, Facebook And WhatsApp Status To friends and loved ones)

> प्रत्येक गोष्टीचा शेवट सुंदर असतो,

जर तो सुंदर नसेल तर तो अंत नसतो,

म्हणून जोपर्यंत सुंदर शेवट मिळत नाही,

तोपर्यंत मेहनत करत रहा, यश तुमची वाट पाहतंय…

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!

> स्वतंत्र होण्याचे धाडस करा,

जिथपर्यंत तुमचे विचार जातात,

तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा,

विचारांना आयुष्यात उतरवण्याचे धाडस करा,

युवा दिनाच्या शुभेच्छा!!

> तरूणांनो स्वतःवर विश्वास ठेवा,

तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा,

तुमचे वेगळेपण स्वीकारा.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!

> तरुणांची सर्जनशीलता आणि समर्पण हेच समाजात खरा बदल घडवून आणू शकतात. तरुणांना प्रेरणा देण्याचा आजचा दिवस आहे.

युवा दिनाच्या शुभेच्छा!!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

Mumbai: धक्कादायक! लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून