Freepik
लाईफस्टाईल

Nag Panchami 2024: श्रावणातील पहिल्या सणाच्या द्या मराठमोळ्या शुभेच्छा; बघा नागपंचमीचे संदेश

Nag Panchami 2024 Wishes in Marathi: कॅलेंडरनुसार यंदा नागपंचमी ९ ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे. या निमित्ताने प्रियजनांना पाठवण्यासाठी शुभेच्छा संदेश बघा.

Tejashree Gaikwad

शास्त्रानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला नागांची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदी दिनदर्शिकेनुसार नागपंचमी तिथी ८ ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजेच ९ ऑगस्टच्या रात्री १२.३७ वाजता सुरू होईल. त्यानंतर ही तारीख १० ऑगस्ट रोजी पहाटे ३.१४ वाजता संपेल. वाढत्या तारखेनुसार नागपंचमीचा सण ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.  या खास सणाच्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास ( Happy Nag Panchami 2024 Marathi, quotes, Shayari, SMS, Messages, Text, Photo, Caption, Images, Banner, Whatsapp Status In Marathi) संदेश.

बघा 'हे' शुभेच्छा संदेश

> शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी
आज श्रावण सण आला आहे नागपंचमी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

> निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला,

शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा,

शिवाच्या गळ्यातील हार झाला

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

> वसंत ऋतूच्या आगमनी,

कोकिळा गाई मंजुळ गाणी नागपंचमीच्या शुभदिनी,

सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी...

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

> तुमचे आयुष्य आनंदी आणि मंगलदायी होवो,

नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!!

> बळीराजाचा कैवारी

पूजा त्याची होते घरोघरी…

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा डोंबिवली स्थानकावर आज आणि उद्या रात्री पॉवर ब्लॉक

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

भारतात AI हब स्थापन होणार; गुगल करणार १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक: अदानीच्या सहकार्याने सर्वात मोठे डेटा सेंटर

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास