रक्षाबंधन म्हणजे प्रेम, जिव्हाळा आणि रक्षणाचं प्रतीक. भाऊ-बहिणीच्या नात्यातली हसरी भांडणं, लाड, मायेच्या गप्पा आणि आयुष्यभराची साथ या एका दिवशी खासपणे उजळून निघते. राखीच्या नाजूक धाग्यात प्रेम, विश्वास आणि सुरक्षिततेचं वचन गुंफलेलं असतं.
यंदा ९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन साजरे होणार आहे. या दिवशी तुमच्या बहिणीला किंवा भावाला काही खास मराठमोळ्या शुभेच्छा, WhatsApp Status किंवा मेसेज पाठवून त्यांच्या दिवसात गोडी वाढवा. आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही निवडक, मनाला भावणारे शुभेच्छा संदेश आणि Quotes.
>रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
.....................
>राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन
प्रेमाने राहू आपण या पुढे आयुष्यभर
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.....................
>कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.....................
>रक्षाबंधनाची गोडी,
तुझ्या प्रेमाने वाढवली
माझ्या जीवनातील उजळणी,
तुझ्या सहवासाने सजवली
हॅप्पी रक्षाबंधन!
.....................
>राखीच्या धाग्याप्रमाणे नाते आहे आपले प्रेमाचे
विश्वास आणि जिव्हाळ्याचे
आधार आणि सोबतीचे
बहिण भावा-च्या नात्याची भावना,
सदैव अशीच टिकुन राहू दे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.....................
>यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन
सदैव करेन तुझं रक्षण
लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन..
तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतर
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.....................
>नात्यात प्रेमाचे बंध असावे
राखीच्या ह्या सुंदर धाग्यासारखे
पक्के आपले नाते असावे,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
.....................
>हे बंध स्नेहाचे,
हे बंध रक्षणाचे,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.....................
>बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
.....................
>श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
या रक्षाबंधनाला प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे हे धागे अधिक घट्ट बांधू या आणि आयुष्यभरासाठी या सुंदर नात्याची गोडी जपू या.
Happy Raksha Bandhan!
(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)