(Photo-@pinterest)
लाईफस्टाईल

प्रतिकारशक्ती वाढवणारी शेवग्याची भाजी; जाणून घ्या सोपी रेसिपी

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, शेवग्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. ग्रामीण भागात तर शेवगा हा पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा घटक मानला जातो.

किशोरी घायवट-उबाळे

दैनंदिन आहारात पौष्टिक आणि सहज उपलब्ध असलेली शेवग्याची भाजी घराघरांत लोकप्रिय होताना दिसत आहे. व्हिटॅमिन्स, कॅल्शियम आणि आयर्नने समृद्ध असलेला शेवगा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, शेवग्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. ग्रामीण भागात तर शेवगा हा पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा घटक मानला जातो.

साहित्य:

  • शेवग्याच्या शेंगा - ४ ते ५

  • मध्यम कांदा (बारीक चिरलेला) - १

  • टोमॅटो (चिरलेला) - १

  • लसूण पाकळ्या (ठेचलेल्या) - ४ ते ५

  • मोहरी - अर्धा चमचा

  • जिरे - अर्धा चमचा

  • हळद - पाऊण चमचा

  • लाल तिखट - १ चमचा

  • गोडा मसाला - १ चमचा

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - २ चमचे

  • कोथिंबीर - (सजावटीसाठी)

कृती:

शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुऊन २ इंचाचे तुकडे करा. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की जिरे आणि लसूण घाला. आता चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. हळद, तिखट, गोडा मसाला आणि मीठ घाला. आता शेवग्याचे तुकडे घालून चांगले हलवा. अर्धा कप पाणी घालून झाकण ठेवून १० ते १२ मिनिटे शिजू द्या. शेवगा मऊ झाला की वरून कोथिंबीर घाला.

टीप:

गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत ही भाजी एकदम मस्त लागते. शेवग्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, रक्तदाब नियंत्रणात राहते, पचन सुधारते. म्हणून ही भाजी आरोग्यासाठी उपयोगी मानली जाते.

Mumbai : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हमाल, पार्किंग, एसी प्रतीक्षागृहाचे अधिकृत दर जाहीर; जादा पैसे घेतल्यास तक्रार करा

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

सख्ख्या बहिणीची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; काही वेळातच भावाने पोलिसांसमोर जाऊन दिली कबुली

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

माथेरानला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच; उद्यापासून चार महिने टॉय ट्रेन बंद, आता जायचं कसं?