लाईफस्टाईल

दिवसभर एका जागी बसून काम करता? जाणून घ्या आरोग्यावर होणारे परिणाम

आधुनिक काळात कामाचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. सतत बसून काम केल्यामुळे लठ्ठपणा, पाठदुखी...

Mayuri Gawade

आधुनिक काळात कामाचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. डेस्क जॉब, लॅपटॉप, मोबाईल आणि वर्क फ्रॉम होममुळे तासंतास खुर्चीत एकाच जागी बसून राहणे ही अनेकांची रोजचीच सवय झाली आहे. काही काळासाठी ही गोष्ट सोपी आणि सोयीची वाटत असली, तरी दीर्घकाळ शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

बैठ्या जीवनशैलीचे गंभीर दुष्परिणाम

सतत बसून काम केल्यामुळे लठ्ठपणा, पाठदुखी, मानदुखी, हृदयविकार आणि मधुमेह यांचा धोका वाढतो. त्याचबरोबर मानसिक आरोग्यावरही ताण आणि नैराश्याचा परिणाम होतो. रक्ताभिसरण नीट न झाल्याने स्नायू आखडतात, हालचाली मंदावतात आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील वाढते.

यावर उपाय म्हणून दर २०-३० मिनिटांनी उठून थोडं चालावं, स्ट्रेचिंग करावं. शक्य असेल तर उभे राहून काही वेळ काम करण्याची सवय लावावी. ऑफिसमध्ये दिवसभर उठणं शक्य नसेल, तर घरी रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. दिवसभरात थोड्या-थोड्या हालचालींमुळे शरीराला लवचिकता मिळते, रक्ताभिसरण सुधारते आणि मन देखील प्रसन्न राहते.

त्यामुळे तुम्ही कामात कितीही व्यस्त असला, तरी दिवसातून काही मिनिटे स्वतःसाठी काढा. कारण नियमित हालचाल केल्यानेच तुमचं हृदय, शरीर आणि मन खर्‍या अर्थाने तंदुरुस्त राहील.

मुंबईतील हॉटेल्स, बार, बेकऱ्या FDA च्या रडारवर; ख्रिसमस-नववर्षाच्या तोंडावर तपासणी मोहीम

"आता कोण गप्प आहे?" रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीनंतर विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबईच्या हवा गुणवत्तेसाठी 'मानस'ची निर्मिती; IIT Kanpur च्या सहकार्याने BMC राबवणार प्रकल्प

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

Thane RTO : वाहनधारकांनो तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली? 'डेडलाईन' जारी; त्वरित ऑनलाइन अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन