लाईफस्टाईल

हीना- मोहरीच्या तेलाचे मिश्रण दूर करेल ‘केसगळती’ची समस्या!

Swapnil S

हीना व मोहरीच्या तेलाचे मिश्रण- केसांच्या आरोग्यासाठी ‘हीना’ अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांचा पोत सुधारतो तसेच टाळूचेदेखील पोषण होते. हीनामुळे केसांचे नुकसान टाळण्यास मदत होते. परिणामी केस चमकदार आणि दाट होतात. तर मोहरीचे तेल अ‍ॅन्टीबॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टीफंगल असल्याने टाळूवरील इन्फेक्शन कमी करण्यास तसेच डॅन्डरफ (कोंडा) कमी करण्यास मदत करतात. यामुळे केसगळतीची मूळ कारणंच रोखण्यात मदत होते. परिणामी केसांचे आरोग्य सुधारते.

या तेलाच्या मिश्रणाचा नियमित टाळूवर हलका मसाज करा. यामुळे केसगळती रोखण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मसाज केल्यानंतर डोक्याला गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल गुंडाळून ठेवावा. यामुळे तेल डोक्यात झिरपण्यास मदत होते.

कसे बनवाल हे मिश्रण?

२५० ग्रॅम मोहरीचे तेल वाडग्यात गरम करा. त्यात ६० ग्रॅम हीना (मेहंदी) ची पानं मिसळून तेल पुरेसे गरम करा. पानं चॉकलेटी रंगाची होईपर्यंत मंद आचेवर तेल गरम करा. थोड्या वेळाने गॅस बंद करून हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळा. आता हे तेलाचे मिश्रण हवाबंद डब्यात झाकून ठेवा. या तेलाच्या मिश्रणाचा नियमित टाळूवर हलका मसाज करा. यामुळे केसगळती रोखण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मसाज केल्यानंतर डोक्याला गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल गुंडाळून ठेवावा. यामुळे तेल डोक्यात झिरपण्यास मदत होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस