केसांच्या वाढीसाठी घरच्या घरी बनवा Herbal Hair Oil   You Tube - She Cooks
लाईफस्टाईल

केसांच्या समस्यांसाठी घरच्या घरी बनवा Herbal Hair Oil

केस गळणे, केसात कोंडा होणे, केस पांढरे होणे या समस्यांनी तुम्ही त्रस्त आहात का? केसांना वेगवेगळ्या प्रकारचे कलर केल्याने केस रूक्ष झाले आहेत? केसांना सातत्याने फाटे फुटत आहेत का? या समस्यांवर तुम्ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने केसांच्या सर्व समस्यांसाठी आयुर्वेदिक तेल बनवू शकता.

Kkhushi Niramish

केस गळणे, केसात कोंडा होणे, केस पांढरे होणे या समस्यांनी तुम्ही त्रस्त आहात का? केसांना वेगवेगळ्या प्रकारचे कलर केल्याने केस रूक्ष झाले आहेत? केसांना सातत्याने फाटे फुटत आहेत का? या समस्यांवर तुम्ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने केसांच्या सर्व समस्यांसाठी आयुर्वेदिक तेल बनवू शकता. ज्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. त्यासाठी खालील साहित्य लागेल.

250 मिली नारळ तेल

150 मिली एरंडेल तेल

मूठभर कढीपत्ता

एक मोठा चमचा मेथी दाणे

एक मोठा चमचा कलोंजीच्या बिया

एक छोटी वाटी कापलेला कांदा

खोबरेल तेल - कोणतेही आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी खोबरेल तेल हाच बेस असतो.

एरंडेल - एरंडेल तेल हे केसांच्या वाढीसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.

मेथी दाणे - केसात कोंडा झाल्यास केस गळण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे केसांमध्ये कोंडा झाल्यास त्यावर मेथी दाणे हे प्रभावी उपाय ठरतात.

कलोंजी बिया - कलोंजीच्या बिया या दिसायला काळ्या असतात. याचा वापर बंगाली खानपानाच्या पदार्थांमध्ये अधिक आढळतो. काही जण त्याला मराठीत काळे तिळ बिया किंवा कांद्याच्या बिया असा एक गैरसमज आहे. त्यामुळे मार्केटमधून या बिया आणताना कलोंजीच्या बिया असेच म्हणावे. या बिया केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहेत असे मानले जाते.

मूठभर कढीपत्ता - कढीपत्ता हे केस गळतीवर अतिशय प्रभावी आहे. नैसर्गिक शाम्पू बनवताना देखील त्याचा उपयोग होतो. कढीपत्त्यात A,B,C, आणि E अशी चार जीवनसत्वे असतात. त्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि मॅग्नेशियम यासारख्या खनिजांनी कढीपत्ता समृद्ध आहे.

कांदा - कांद्यामुळे केसांची वाढ होते. अनेक वेळा कांद्याचा रस केसांमध्ये लावून केस धुतले जातात.

कृती

सर्वप्रथम मेथी दाणे भाजून घ्या. नंतर कलोंजीच्या बिया भाजून घ्या. दोन्ही एकत्रित करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता पॅनमध्ये पहिले खोबरेल तेल गरम करून घ्या. तेल गरम होत आले की त्यात एरंडेल तेल घाला. दोन्ही तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक केलेले मेथी दाणे आणि कलोंजीची पावडर टाका. हे मिश्रण उकळू द्या. त्यानंतर त्यात कढीपत्ता टाका. कढीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेला असावा. लक्षात घ्या कढीपत्त्यावर कोणतेही ठिपके पडलेले नसावे. कढीपत्त्याची हिरवीगार पाने असावी. ही पाने तेलात टाकून मिश्रण उकळू द्या. सर्वात शेवटी चिरलेला कांदा टाकून मिश्रण उकळू द्या. हे उकळलेले तेल गार झाल्यानंतर बारीक गाळणीने गाळून बोटलमध्ये भरून ठेवा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला मालिश केल्याने केसांना निश्चितच फायदा होईल.

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार