हिल्सने लूक परफेक्ट… पण शरीराचा बॅलन्स बिघडतो! संधिवाताचा धोका वाढतो, तज्ज्ञांचा इशारा 
लाईफस्टाईल

हिल्सने लूक परफेक्ट… पण शरीराचा बॅलन्स बिघडतो! संधिवाताचा धोका वाढतो, तज्ज्ञांचा इशारा

हिल्समध्ये पाय सतत ‘टोकदार’ स्थितीत राहतात. अनेक महिलांना वर्षानुवर्षं हिल्स वापरल्यानंतर सपाट सँडल्समध्ये चालायलाही त्रास होतो यामागचं खरं कारण हेच आहे.

Mayuri Gawade

उंच हिल्स म्हणजे आकर्षक लूकचा अविभाज्य भाग. पार्टी असो, ऑफिस असो किंवा कोणतंही स्टायलिश आउटफिट हिल्स प्रत्येक लूकला उठाव देतात. पण या परफेक्ट फॅशनच्या मागे शरीरावर सुरू असलेला ताण मात्र दिसत नाही. आणि याच गंभीर परिणामांबद्दल अमेरिकेतील मेरीलँडमधील डॉ. कुणाल सूद यांनी महिलांना स्पष्ट इशारा दिला आहे.

हिल्समुळे शरीराचा बॅलन्स कसा बिघडतो?

डॉ. सूद यांच्या मते, हिल्स घालत राहिल्याने शरीराची नैसर्गिक ठेवण (alignment) हळूहळू बदलते.

  • शरीराचं वजन पुढे सरकतं

  • सांध्यांवर अनैसर्गिक दाब पडू लागतो

  • गुडघ्यांच्या आतील भागावर जास्त ताण येतो

हा ताण वर्षानुवर्षं कायम राहिला तर cartilage झिजते आणि knee osteoarthritis (गुडघ्यांचा संधिवात) होण्याचा धोका झपाट्याने वाढतो.

केवळ गुडघाच नाही, पायांवरही मोठा परिणाम

हिल्समध्ये पाय सतत ‘टोकदार’ स्थितीत राहतात. त्यामुळे:

  • Achilles tendon म्हणजेच पायाच्या मागील बाजूस असलेला एक जाड आणि मजबूत स्नायूबंध छोटा आणि कडक होतो

  • calf muscles ताणलेले आणि संकुचित होतात

  • ankle चं लवचिकपण कमी होतं

  • फ्लॅट शूज घालणं अस्वस्थ वाटू लागतं

अनेक महिलांना वर्षानुवर्षं हिल्स वापरल्यानंतर सपाट सँडल्समध्ये चालायलाही त्रास होतो यामागचं खरं कारण हेच आहे.

चालण्याची नैसर्गिक पद्धतही बदलते

हिल्सची उंची चालण्याची पद्धत पूर्णपणे बदलते.

  • पावलं लहान पडतात

  • चाल मंदावते

  • स्नायू वेगळ्या पद्धतीने काम करतात

शरीर या बदलांना सरावलं की, हिल्स न घातल्यावरही चालण्यात अडथळे जाणवतात. म्हणजे लूक परफेक्ट करण्यासाठी केलेली छोटीशी सवय दीर्घकालीन बदल निर्माण करू शकते.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • हिल्स फक्त खास प्रसंगांसाठी वापरा

  • रोजच्या वापरासाठी आरामदायक, सपोर्टिव्ह फुटवेअर निवडा

  • नियमित कॅल्फ स्ट्रेचिंग, टाचेसाठी एक्सरसाइज करा

  • पायांना अधूनमधून रिलॅक्स पोजिशन्स द्या

हिल्स तुमचा लुक ग्लॅमरस करतात, पण शरीरावर होणारा ताण मात्र अदृश्य असतो. पुढच्या वेळी हिल्स निवडताना फक्त फॅशनवर नाही तर शरीराच्या संकेतांवरही लक्ष द्या.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट