'एआय' ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

Holi 2026: होळीच्या रंगांपासून त्वचेचे रक्षण कसे कराल? फॉलो करा सोप्या स्किनकेअर टिप्स

तज्ज्ञांच्या मते, केमिकलयुक्त रंगांच्या संपर्कामुळे त्वचेवर खाज, पुरळ, जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे होळी खेळण्यापूर्वी आणि त्यानंतर त्वचेचे संरक्षण करण्यासाठी काही सोप्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

किशोरी घायवट-उबाळे

रंग, उत्साह आणि आनंदाचा सण असलेली होळी राज्यभरात मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. रंगांची उधळण, मित्र-परिवारासोबतचा आनंद आणि सणाचा उत्साह अनुभवताना त्वचेची योग्य काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, केमिकलयुक्त रंगांच्या संपर्कामुळे त्वचेवर खाज, पुरळ, जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे होळी खेळण्यापूर्वी आणि त्यानंतर त्वचेचे संरक्षण करण्यासाठी काही सोप्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

होळी खेळण्यापूर्वी त्वचेचे रक्षण करा

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, होळी खेळण्यापूर्वी चेहरा, हात आणि पायांवर नारळ तेल किंवा बदाम तेल भरपूर प्रमाणात लावावे. तेलाचा थर त्वचेवर संरक्षक कवच तयार करतो आणि रंग त्वचेत खोलवर शिरण्यापासून रोखतो. तसेच उन्हात रंग खेळताना SPF 30 किंवा त्याहून अधिक क्षमतेचे सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे, जे त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण देते.

त्वचा शक्यतो झाकलेली राहील असे पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करावेत. ओठ कोरडे पडू नयेत म्हणून लिप बाम लावावा, तर नखांवर नेलपेंट लावल्यास रंग नखांमध्ये अडकत नाही. होळीपूर्वी मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा कोरडी होण्याचा धोका कमी होतो.

रंग खेळल्यानंतर त्वचेची योग्य स्वच्छता आवश्यक

होळी खेळल्यानंतर अंघोळ करताना गरम पाण्याचा वापर टाळावा. त्याऐवजी, कोमट पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. त्वचा स्वच्छ करताना ती जोरात घासू नये, कारण त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. सौम्य साबण किंवा फेसवॉशचा वापर करणे अधिक सुरक्षित ठरते.

त्वचा स्वच्छ करण्यासाठी बेसन, दही आणि हळदीचा लेप हा प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. हा लेप त्वचेवरील रंग काढण्यास मदत करतो आणि त्वचेला पोषण देतो. तसेच कच्चे दूध किंवा गुलाबपाणी वापरल्यास त्वचेची जळजळ कमी होण्यास आणि त्वचा शांत राहण्यास मदत होते. अंघोळीनंतर चांगल्या प्रतीचा मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा मऊ आणि निरोगी राहते.

नैसर्गिक रंगांना द्या प्राधान्य

तज्ज्ञांनी केमिकलयुक्त गडद रंगांचा वापर टाळण्याचे आणि शक्यतो नैसर्गिक किंवा हर्बल रंगांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्वचेवर खाज, पुरळ किंवा जळजळ जाणवल्यास दुर्लक्ष न करता तात्काळ त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

योग्य काळजी आणि साध्या उपाययोजनांच्या मदतीने होळीचा आनंद सुरक्षितपणे घेता येतो आणि त्वचेचे संभाव्य नुकसान टाळता येते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये