लाईफस्टाईल

घरच्या घरी बनवा दूध पावडर! ९०% लोकांना ठाऊकच नाही इतकी सोपी आहे ही पद्धत

ही पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा. कोरड्या आणि थंड जागी ठेवल्यास ती १ ते २ महिने उत्तम टिकते.

Mayuri Gawade

आरोग्याची काळजी घेत असताना आपण अनेक वेळा बाजारात मिळणाऱ्या वस्तूंवर अवलंबून राहतो. पण त्या नेहमीच सुरक्षित असतात असं नाही. दूध पावडर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. चहा, कॉफी, मिठाई किंवा खीर प्रत्येक स्वयंपाकघरात वापरली जाणारी ही वस्तू, आता तुम्ही अगदी घरच्या घरी बनवू शकता, तेही फक्त दोनच घटकांपासून!

बाजारात मिळणाऱ्या दूध पावडरमध्ये अनेकदा रासायनिक पदार्थ, कृत्रिम सुगंध आणि प्रिझर्व्हेटिव्हज असतात. दीर्घकाळ वापरल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः मुलं आणि वृद्ध लोकांसाठी ही पावडर हानिकारक ठरू शकते. पण घरच्या घरी तयार केलेली पावडर १००% नैसर्गिक असते, त्यात कोणतेही रसायन नसते. त्यामुळे ती आरोग्यदायी आणि सुरक्षित ठरते.

चला तर मग जाणून घेऊ ही सोपी पद्धत...

साहित्य:

  • फुल क्रीम दूध - १ लिटर

  • साखर - २ ते ३ चमचे

  • जाड कढई किंवा नॉन-स्टिक पॅन

कृती:

सर्वप्रथम कढईत १ लिटर फुल क्रीम दूध ओतून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. दूध उकळू लागल्यावर ते तळाशी लागू नये म्हणून सतत हलवत राहा. थोडं घट्ट झाल्यावर त्यात २ ते ३ चमचे साखर टाका आणि चांगलं मिसळा. आता हे दूध मंद आचेवर ३० ते ४० मिनिटे शिजवा. या दरम्यान त्यातील पाणी पूर्ण निघून जाईल आणि मिश्रण घट्ट होईल.

दूध घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि ते मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये टाका आणि बारीक फिरवा, जोपर्यंत पावडरसारखा बारीक पोत तयार होत नाही. हीच तुमची घरगुती दूध पावडर तयार आहे!

पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा. कोरड्या आणि थंड जागी ठेवल्यास ती १ ते २ महिने उत्तम टिकते.

आजच्या काळात नैसर्गिक पदार्थांकडे परत वळणे हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. बाजारातील पावडरवर अवलंबून न राहता ही घरी बनवलेली दूध पावडर वापरून बघा. आरोग्यदायी, चविष्ट आणि पूर्णपणे सुरक्षित!

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

Goa Nightclub Fire Update : 'त्या' क्षणी किमान १०० जण डान्स करत होते; प्रत्यक्षदर्शीची माहिती

Goa Nightclub Fire : आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त, मृतांच्या कुटुंबीयांना धीर; सरकारकडून मदतीचे आश्वासन

Goa Nightclub Fire : गोव्याच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग; २३ जणांचा मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद