पिवळा दिसला म्हणून लगेच उचलू नका! आंबे घेताना 'ही' चूक तुम्हाला महागात पडू शकते 
लाईफस्टाईल

पिवळा दिसला म्हणून लगेच उचलू नका! आंबे घेताना 'ही' चूक तुम्हाला महागात पडू शकते

उन्हाळ्यात आंबे खरेदी करताना फक्त रंग पाहून निर्णय घेऊ नका! केमिकलने पिकवलेले आंबे ओळखण्यासाठी या सोप्या टिप्स जाणून घ्या. नैसर्गिक आणि सुरक्षित आंबे कसे निवडायचे, घरच्या घरी टेस्ट कशी करायची आणि आरोग्याचा धोका कसा टाळायचा हे सगळं एका ठिकाणी.

Mayuri Gawade

उन्हाळा आला की आंब्यांचा सीझन सुरू होतो… आणि बाजारात दिसणारे पिवळेधमक, चमकदार आंबे पाहून कोणालाच मोह आवरत नाही. पण फक्त दिसण्यावर भाळून आंबे घेतले, तर तो निर्णय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. कारण आजकाल आंबे लवकर पिकवण्यासाठी केमिकल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.

म्हणूनच, आंबा खरेदी करताना थोडं ‘स्मार्ट’ होणं गरजेचं आहे. काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुम्ही सहज ओळखू शकता की आंबा खरोखर नैसर्गिक आहे की केमिकलने पिकवलेला.

सुगंधच देतो इशारा
नैसर्गिक पिकलेल्या आंब्याला हलका, गोड आणि ताजा सुगंध असतो. जर आंब्याला वासच येत नसेल किंवा थोडासा केमिकलसारखा वास जाणवत असेल, तर तो टाळणंच योग्य.

फक्त रंगावर विश्वास ठेवू नका
खूपच परफेक्ट आणि एकसारखा पिवळा रंग असलेले आंबे आकर्षक वाटतात, पण तेच संशयास्पद असू शकतात. नैसर्गिक आंब्याचा रंग थोडा वेगवेगळ्या छटांमध्ये असतो.

डाग आणि खुणा सांगतात सत्य
आंब्यावर काळे डाग, पांढरे चट्टे किंवा सुई टोचल्यासारख्या खुणा दिसल्या, तर तो आंबा कृत्रिमरीत्या पिकवलेला असण्याची शक्यता असते.

हाताने तपासणं विसरू नका
आंबा हलक्या हाताने दाबून पाहा. जर काही भाग खूप मऊ आणि काही भाग कडक वाटत असेल, तर तो नैसर्गिक नाही. चांगला आंबा सर्व बाजूंनी समान मऊ असतो.

घरी करून पाहा छोटी टेस्ट
आंबे घरी आणल्यानंतर पाण्यात थोडा बेकिंग सोडा टाकून धुवा. पाण्याचा रंग बदलू लागला, तर आंब्यावर केमिकलचा प्रभाव असण्याची शक्यता आहे.

शेवटी एक लक्षात ठेवा…
आंबा खाण्याचा खरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा तो सुरक्षित आणि नैसर्गिक असतो. त्यामुळे पुढच्या वेळी बाजारात जाताना फक्त दिसण्यावर नाही, तर या छोट्या गोष्टींवर लक्ष द्या. थोडीशी काळजी घेतली, तर चवही टिकेल आणि आरोग्यही सुरक्षित राहील!

संघर्षातून फुललेल्या ‘कमळा’चा महाराष्ट्रातील प्रवास

आजचे राशिभविष्य,७ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

घरच्या घरी बनवा चटपटीत पनीर सँडविच; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

दिल्ली विधानसभा परिसरात सुरक्षाभंग; गेट तोडून अज्ञात कारचा शिरकाव, पुष्पगुच्छ ठेवून चालक फरार

Mumbai : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; आता १५ डब्यांच्या लोकल धावणार, विरार कारशेडमध्ये दाखल