Freepik
लाईफस्टाईल

Coconut Ladoo Recipe: घरी बनवा नारळाचे लाडू, मिळेल हाडं आणि पाठदुखीपासूनही आराम!

Healthy Laddu Recipe: नारळाच्या लाडूमध्ये लोह, फायबर, प्रोटीन आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो.

Tejashree Gaikwad

Coconut ladoo with jaggery: आपल्या देशात अनेक प्रकारचे लाडू बनतात आणि जे लोक फार आवडीने खातात. पण लाडू गोड असल्याने त्याला अनहेल्दी मानला जातं. परंतु हे लक्षात घेणे गरजेचे आहे की सगळेच लाडू हे अनहेल्दी असतात. काही लाडू हे आरोग्यदायीही असतात. आज आम्ही तुमहाला चविष्ट नारळाचे लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहोत. नारळाच्या लाडूमध्ये लोह, फायबर, प्रोटीन आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. या सगळ्या गोष्टी शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. जर तुमची हाडं किंवा पाठ दुखत असेल तर हे लाडू आवर्जून खा. कारण नारळाच्या लाडूमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडांसाठी फायदेशीर असते. चला नारळाचे लाडू कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

  • अर्धा किलो नारळ

  • ३०० ग्रॅम डिंक

  • १०० ग्रॅम काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे

  • अर्धा किलो गूळ

  • अर्धा किलो तूप

जाणून घ्या कृती

> नारळाचे लाडू बनवण्यासाठी नारळाला छान बारीक किसून घ्या.

> आता एक कढईत अर्धी वाटी तूप घाला. आता या तुपात काजू, बदाम, अक्रोड आणि मनुके सोनेरी होईपर्यंत छान परतून घ्या.

> याच तुपाच्या कढईत किसलेले खोबरे पण घालून छान परतून घ्या.

> आता त्याच पॅनमध्ये ३०० ग्रॅम डिंक आणि अर्धा किलो गूळ घालून घालून ते वितळू द्या. दोन्ही साहित्य वितळेपर्यंत छान शिजवा.

> गूळ आणि डिंक वितळत असताना, भाजलेले ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये बारीक करा.

> गूळ आणि डिंक चांगला वितळला की त्यात भाजलेले खोबरे पावडर आणि ड्राय फ्रुट घाला.

> हे सर्व साहित्य चांगले एकजीव झाल्यावर गॅस बंद करा.

> लाडूचे मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताने छान लाडू बांधायला सुरुवात करा.

> लाडू बांधून झाल्यावर गार्निशिंगसाठी त्यांना किसलेल्या नारळात चांगले गुंडाळा.

> तुमचे स्वादिष्ट नारळाचे लाडू तयार आहेत.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश