खूप खाल्ली कांदा भजी, आता बनवा कुरकुरीत कांद्याचे रिंग; चव अशी की बाहेरचं फास्ट फूड विसराल छायाचित्र : कॅनव्हा
लाईफस्टाईल

खूप खाल्ली कांदा भजी, आता बनवा कुरकुरीत कांद्याचे रिंग; चव अशी की बाहेरचं फास्ट फूड विसराल

कांदा भजीची पारंपरिक चव सर्वांना आवडते, पण कुरकुरीत कांद्याचे रिंग ही मजा काही वेगळीच आहे. पार्टीसाठी असो किंवा संध्याकाळी हलका स्नॅक हवा असेल, तर झटपट तयार होणारे हे रिंग बेस्ट ऑप्शन आहेत..

Mayuri Gawade

कांदा भजीची पारंपरिक चव सर्वांना आवडते, पण कुरकुरीत कांद्याचे रिंग ही मजा काही वेगळीच आहे. पार्टीसाठी असो किंवा संध्याकाळी हलका स्नॅक हवा असेल, तर झटपट तयार होणारे हे रिंग बेस्ट ऑप्शन आहेत.. याची चवही इतकी भारी आहे की बाहेरच्या फास्ट फूडची गरज नाही. मुलं, मित्रमंडळी किंवा पाहुण्यांसाठीही हे स्नॅक परफेक्ट आहे.

साहित्य:

  • कांदा - २ मोठे

  • मैदा - १ कप

  • कॉर्नफ्लोअर - २ टेबलस्पून

  • ब्रेड चुरा - १ कप

  • लाल तिखट - १/२ टेबलस्पून

  • काळी मिरी पावडर - १/२ टेबलस्पून

  • मीठ – चवीपुरते

  • ओरेगॅनो - १ टीस्पून

  • चाट मसाला - १ टीस्पून

  • सोडा - १/४ टीस्पून

  • पाणी - आवश्यकतेनुसार

  • तेल - तळण्यासाठी

कृती :

सुरुवातीला मध्यम गोलाकार कांद्याचे तुकडे करा. नंतर एका मोठ्या वाटीत मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, लाल तिखट, काळी मिरी, ओरेगॅनो, चाट मसाला आणि सोडा टाकून थोडं थोडं पाणी घालत घट्टसर पण लवकर लाटता येईल असे पीठ तयार करा. कांद्याचे तुकडे या पीठात दोन्ही बाजूने घोळवून घ्या आणि नंतर ब्रेड चुर्यात लपेटा, जेणेकरून तळल्यानंतर बाहेरील कवच कुरकुरीत होईल. नंतर कढईत तेल गरम करून त्यात कांद्याचे रिंग्स टाकून दोन्ही बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तयार कांद्याचे रिंग गरम गरम हिरवी चटणी, टोमॅटो केचप किंवा दहीसोबत सर्व्ह करा.

खास टिप्स:

  • कांद्याचे रिंग अधिक कुरकुरीत हवे असतील तर ब्रेड चुर्यात लाटण्याआधी थोडा पावडर मैदा शिंपडा.

  • हवे असल्यास पाणी थोडे कमी घेऊन पीठ घट्ट करा, जेणेकरून तेलात तळल्यावर रिंग जास्त शोषून घेणार नाही.

  • ओरेगॅनो आणि चाट मसाला आधीच पीठात मिसळल्याने स्वाद अगदी घरच्या खाण्यासारखा होतो.

  • थोडे वेळ फ्रिजमध्ये ठेवून पीठ थंड करून घ्या, त्याने रिंग तळताना फार तेल शोषणार नाहीत.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती