Sunday Special Breakfast  Freepik
लाईफस्टाईल

Rice-Dal Vada Recipe: रविवारच्या नाश्त्यासाठी बनवा टेस्टी डाळ-तांदळाचे वडे; रिमझिम पावसात मिळेल आनंद

Sunday Monsoon Breakfast Recipe: तुम्ही डाळ आणि तांदळापासून वडे बनवू शकता. हे बनवायला थोडा वेळ लागतो, पण ही डिश खायला सगळ्यांना मजा येईल. ही रेसिपी कशी बनवायची ते जाणून घ्या.

Tejashree Gaikwad

Crispy Rice-Dal Khatta Vada: पावसाळा आणि त्यात रविवारचा दिवस. अशावेळी सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी टेस्टी खावेसे वाटते. नेहमीचे पकोडे, भाजी खाऊन कंटाळा येतो. चहा सोबत काही तरी टेस्टी खावेसे वाटते. अशावेळी तुम्ही एक हटके रेसिपी बनवू शकता. तुम्ही डाळ आणि तांदळापासून वडे बनवू शकता. हे बनवायला थोडा वेळ लागतो, पण ही डिश खायला सगळ्यांना मजा येईल. ही रेसिपी (Sunday weekend special recipe)कशी बनवायची ते जाणून घ्या.

लागणारे साहित्य

१ वाटी तांदूळ, १/२ कप उडीद डाळ, १/२ कप चना डाळ, १/२ कप दही, पाणी, चिरलेली कोथिंबीर, १/२ टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, १/४ टीस्पून हिंग, १ /2 टीस्पून जिरे, २ ते ३ टीस्पून पांढरे तीळ, १/२ टीस्पून आले आणि हिरवी मिरची पेस्ट

जाणून घ्या कृती

  • कढई नीट तापू द्या आणि नंतर त्यात तांदूळ आणि दोन्ही डाळी घालून मंद आचेवर किमान ४ ते ५ मिनिटे परतून घ्या.

  • गॅस बंद करून थंड होऊ द्या.

  • आता मिक्सरमध्ये हे मिश्रण टाकून बारीक करून घ्या आणि एका भांड्यात काढा.

  • या डाळीत दही आणि तांदळाच्या पावडरमध्ये आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून कणकेप्रमाणे मळून घ्या.

  • ते झाकून ठेवा आणि किमान ६ ते ७ तास असेच राहू द्या.

  • त्यानंतर त्यात चिरलेली कोथिंबीर आणि हळद घाला.

  • त्यासोबत त्यात मीठ, हिंग, जिरे, पांढरे तीळ टाका.

  • आले आणि हिरवी मिरची बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात घाला.

  • चमच्याने किंवा हाताने सर्वकाही मिसळा.

  • कढईत तेल तापायला ठेवा.

  • मिश्रणात थोडी बेकिंग पावडर घाला.

  • आता एक सुती कापड ओले करा.

  • डाळ आणि तांदूळ या मिश्रणातून अंडाकृती आकाराचे वडे बनवा आणि या सुती कापडावर ठेवा.

  • गरम तेलात दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा.

हे वडे तुम्ही प्रवासातही सोबत घेऊन जाऊ शकता कारण हे वडे सहज खराब होत नाही.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी