Hyderabadi Baingan Salan Recipe: वांग म्हंटल की अनेकजण नाक मुरडतात. फक्त मुलंच नाही तर मोठ्यांनाही ही भाजी आवडत नाही. परंतु वेगवेगळ्या पद्धती आणि उत्तम मसाल्यांचा वापर केल्यास वांग्याची चव वाढवता येते. तुम्हाला हवे तसे मसाले घालून वांग्याची भाजी बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल. आज आम्ही तुम्हाला हैदराबाद स्टाईल वांग्याचे सालण बनवायला शिकवणार आहोत. ही रेसिपी इतकी उत्तम आहे की तुम्ही आवर्जून पुन्हा पुन्हा बनवाल. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
१/२ किलो वांगी (लहान आकार), ८ ते १० कढीपत्ता, १ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून मेथी दाणे, १/२ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून हळद पावडर
ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य
१ टीस्पून धणे, १/२ टीस्पून तीळ, १/२ कप शेंगदाणे, १ टीस्पून जिरे, १/२ कप कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार तेल, १ टीस्पून धने पावडर (सर्व गोष्टी भाजून घ्या आणि बारीक पावडर करा.) १/२ कप चिंचेचा कोळ, ताजी कोथिंबीर, चवीनुसार मीठ
जाणून घ्या कृती
वांगी पाण्याने धुवा छान धुवून आणि कापडाने पुसून घ्या.
लहान आकाराच्या वांग्याचे चार भाग करा. वांग्याचे देठ कापू नका, देठासोबत वांग आपल्याला वापराचे आहे.
आता कापलेली वांगी मिठाच्या पाण्यात काही वेळ भिजवून ठेवा.
सूर्य बाजूला कढईत तेल घालून छान तापू द्या.
आता त्यात मेथी दाणे आणि जिरे टाका. ते तडतडल्यावर त्यात हळद, कढीपत्ता आणि तीळ घालून परतून घ्या.
यानंतर लाल तिखट घाला.
मसाले चांगले भाजून झाल्यावर त्यात वांगी घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. परतून झाल्यावर वांगी बाहेर काढा.
त्याच पॅनमध्ये सर्व वाटलेले मसाले आणि उरलेले तेल घालून ५ ते ७ मिनिटे परतून घ्या.
या मसाल्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ घालून मंद आचेवर ५ मिनिटे शिजवा.
१० मिनिटांनंतर या तयार ग्रेव्हीमध्ये वांगी घाला आणि उकळण्याची प्रतीक्षा करा.
स्वादिष्ट हैदराबादी मसालेदार वांग्याचे सालण तयार आहे.