Freepik
लाईफस्टाईल

Kesar Shrikhand Puri Recipe: अक्षय्य तृतीयेच्या सणाला बनवा केशर श्रीखंड आणि पुरी, नोट करा रेसिपी!

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या या सणाला अजून खास बनवण्यासाठी घरी जेवणासाठी बनवा केशर श्रीखंड आणि पुरी. सोपी रेसिपी जाणून घ्या.

Tejashree Gaikwad

Akshaya Tritiya 2024 Special Kesar Shrikhand Puri: दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया सण हा साजरा केला जातो. यंदा आज १० मे रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे. अक्षय्य तृतीया हा सण म्हणजे शुभ मुहूर्तापैकी एक आहे. या खास प्रसंगी जेवायला काही तरी छान असायलाच पाहिजे. घरी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी आवर्जून गोडाचे जेवण बनवा. तुम्हाला आजच्या दिवशी केशर श्रीखंड आणि पुरी बनवून आपल्या प्रियजनांचे तोंड गोड करता येईल. केशर श्रीखंड हा एक पारंपारिक गोड पदार्थ आहे आणि त्याची चव अनेकांना आवडते. या चविष्ट गोड पदार्थासोबत तुम्ही गरमा गरम पुरी बनवू शकता. चला आजच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घरी केशर श्रीखंड आणि पुरी कशी बनवायची हे जाणून घेऊयात.

केशर श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य

क्रीम - १ वाटी

पनीर - १ वाटी

दही - १/४टेबलस्पून

साखर - २ टेस्पून

दूध - २ चमचे

केशर (भिजवलेले) - १/४ टेबलस्पून

चिरलेला पिस्ता - १ टेबलस्पून

जाणून घ्या कृती

सर्वप्रथम दही घेऊन त्याला एका सुती कपड्यात घालून त्याच्यातील पाणी पिळून काढून टाका. यानंतर हे दही मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्यात क्रीम आणि पनीर घालून छान एकत्र बारीक वाटून घ्या. आता दुसरे भांडे घ्या आणि त्यात दूध, केशर, साखर, पिस्ता घाला आणि छान मिसळा. यानंतर हे मिश्रण २ ते ३ तास ​​थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. २-३ तासानंतर फ्रिजमधून हे मिश्रण काढून दह्याच्या मिश्रणात घालून चांगले मिसळा. आता हे मिश्रण २ ते ३ मिनिटे फेटून घ्या. यानंतर त्यात बारीक चिरलेला पिस्ता घालून सजवा. अशाप्रकारे केशर श्रीखंड तयार आहे.

पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

२५० ग्रॅम - गव्हाचे पीठ

७५ ग्रॅम - रवा

३० मिली- तेल

मीठ

तेल (तळण्यासाठी)

जाणून घ्या पुरी बनवण्याची रेसिपी

सर्व साहित्य एकत्र करून घट्ट मळून घ्या. साधारण ३० मिनिटे मळलेले पीठ असेच ठेवा. आता या कणिकेचे गोळे बनवून छोट्या छोट्या आकारात लाटून घ्या. गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात लाटलेली पुरी टाका आणि छान तळून घ्या. ही गरम पुरी घरी फ्रेश बनवलेल्या केशर श्रीखंड सोबत खायला द्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी