Pixabay
लाईफस्टाईल

Popcorn Recipe: झटपट घरच्या घरी कुकरमध्ये बनवा पॉपकॉर्न, ट्राय करा 'हा' सोपा हॅक

How To Make Popcorn At Home: तुम्ही अगदी मिनिटांत घरी पॉपकॉर्न सहज तयार करू शकता. यासाठी तुम्हाला एक छोटासा हॅक फॉलो करायचा आहे.

Tejashree Gaikwad

Tea Time Snacks: गरमा गरम पॉपकॉर्नसोबत सिनेमा बघायला कोणाला आवडत नाही. या पावसाळ्यात तर अनेकांना पॉपकॉर्न खायला आवडतात. पॉपकॉर्न (popcorn in cooker) बाजारात सहज मिळतात. पण तरी गरमागरम पॉपकॉर्न खाण्याची वेगळीच मज्जा असते. यासाठी तुम्ही घरी पॉपकॉर्न बनवू शकता. होय, तुम्हाला यासाठी कोणत्याही मशीनची गरज नाही. रोजच्या वापरातील कुकरचा वापर करून तुम्ही फक्त ५ मिनिटांत पॉपकॉर्न बनवू शकता.अशाप्रकारे तुम्ही घरीच चविष्ट बटर पॉपकॉर्न बनवू शकता. मुलांसाठीही हा आरोग्यदायी स्नॅक पर्याय आहे. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.

कसे बनवायचे कुकरमध्ये पॉपकॉर्न?

  • सर्वप्रथम कॉर्नचे छोटे दाणे अर्थात मका घ्या. ही मका निवडताना खूप पांढरे किंवा मोठे आणि सपाट मका घेऊ नका.

  • आता कुकर गॅसवर ठेवा आणि त्यात २ टेबलस्पून रिफाइंड तेल किंवा बटर घाला. बटर पॉपकॉर्नची चव वेगळी लागते. बटर गरम झाल्यावर त्यात १/४ कप मका घाला.

  • आता गॅसची आंच मंद करा आणि नंतर मका छान परतून घ्या आणि सतत मका परतत राहा.

  • आता मीठ टाका आणि मग १-२ दाणे फुटायला लागल्यावर त्यात अर्धा चमचा हळद घाला.

  • आता २-३ मका पॉप होऊ लागताच तेव्हा कुकरचे झाकण बंद करा. कुकरची शिट्टी काढून गॅसची आच खूप वर ठेवा. तुम्हाला पॉपकॉर्न पॉपिंगचा आवाज ऐकू येईल.

  • कुकरमधून येणारा आवाज कमी झाला आहे असे वाटल्यावर गॅस बंद करा आणि कुकरचे झाकण काढून तपासा. तुम्हाला दिसेल की संपूर्ण कुकर पॉपकॉर्नने भरलेला आहे.

  • स्वादिष्ट हलका पिवळा आणि बटरी पॉपकॉर्न अवघ्या काही मिनिटांत तयार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी