रोजच्या व्यायामाचा कंटाळा येतोय? सोप्या ट्रिक्स फॉलो करा, फिटनेस आपोआप रुटीन बनेल 
लाईफस्टाईल

रोजच्या व्यायामाचा कंटाळा येतोय? सोप्या ट्रिक्स फॉलो करा, फिटनेस आपोआप रुटीन बनेल

फिट राहायचं, शरीर तंदुरुस्त ठेवायचं, असं सगळ्यांनाच वाटतं. पण धावपळीच्या आयुष्यात तोच उत्साह रोज टिकवणं अनेकांसाठी कठीण ठरतं. कधी वेळ नसतो, कधी कंटाळा येतो, तर कधी व्यायामच ओझं वाटू लागतं. मात्र, व्यायामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला, तर स्वतःला फिटनेससाठी प्रवृत्त करणं खूप सोपं होऊ शकतं.

Mayuri Gawade

फिट राहायचं, शरीर तंदुरुस्त ठेवायचं, असं सगळ्यांनाच वाटतं. पण धावपळीच्या आयुष्यात तोच उत्साह रोज टिकवणं अनेकांसाठी कठीण ठरतं. कधी वेळ नसतो, कधी कंटाळा येतो, तर कधी व्यायामच ओझं वाटू लागतं. मात्र, व्यायामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला, तर स्वतःला फिटनेससाठी प्रवृत्त करणं खूप सोपं होऊ शकतं.

व्यायाम सुरू ठेवण्यासाठी सोपे पण परिणामकारक उपाय

खूप वेळ नको, १५ मिनिटांपासून सुरुवात करा
"एक तास व्यायाम झाला नाही, तर काही उपयोग नाही," हा गैरसमज आधी दूर करा. फक्त १५-२० मिनिटांची हलकी हालचालसुद्धा शरीरासाठी फायदेशीर ठरते. घरातच डान्स करा, झुंबा करा, मुलांसोबत खेळा किंवा थोडं चालणं करा. परफेक्शनच्या नादात न पडता, जितका वेळ मिळेल तितकाच व्यायाम करा.

व्यायामाला फक्त वजनाशी जोडू नका
अनेकजण वजन कमी करण्यासाठीच व्यायाम करतात. अपेक्षित परिणाम लगेच दिसले नाहीत, की उत्साह कमी होतो. त्याऐवजी तणाव कमी होणं, ऊर्जा वाढणं, स्नायू आणि हाडं मजबूत होणं याकडे लक्ष द्या. वजन कमी होणं हा बोनस आहे; मुख्य उद्दिष्ट आरोग्य असायला हवं.

तुम्हाला आवडणारा व्यायाम निवडा
जिम कंटाळवाणा वाटत असेल, तर स्वतःला तिथे जबरदस्तीने बांधून ठेवू नका. पोहणं, सायकलिंग, चालणं, बॅडमिंटन, टेनिस किंवा झुंबा, जे आवडतं ते करा. आवडती अ‍ॅक्टिव्हिटी असेल, तर व्यायाम 'काम' न राहता 'आनंद' वाटतो.

व्यायाम का करताय, यामागचे कारण ठरवा
फक्त फिट दिसण्यासाठी नव्हे, तर मुलांसोबत खेळताना दम न लागावा, रोज फ्रेश वाटावं, थकवा कमी व्हावा, असं स्वतःचं कारण शोधा. ध्येय स्पष्ट असलं, की व्यायामासाठी मन तयार होतं.

थोड्या उपयोगी टिप्स

  • सोबत व्यायाम करणारा मित्र किंवा जोडीदार ठेवा; मजा आणि सातत्य दोन्ही वाढतं

  • छोट्या लक्ष्यांची यादी करा; प्रत्येक टप्पा पूर्ण झाला, की स्वतःला प्रोत्साहन मिळतं

  • रोज एकाच प्रकारचा व्यायाम न करता नवनवीन प्रकार ट्राय करा, म्हणजे कंटाळा येत नाही

थोडक्यात सांगायचं तर, वेळ नाही, उत्साह नाही, ही कारणं बाजूला ठेवा. लहान सुरुवात करा, व्यायामात मजा जोडा आणि हळूहळू स्वतःसाठी एक निरोगी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैली तयार करा.

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार