पार्लरला जाण्याची गरज नाही! घरच्या घरी करा 'हायड्रा फेशियल'; कमी खर्चात मिळवा नैसर्गिक ग्लो 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

पार्लरला जाण्याची गरज नाही! घरच्या घरी करा 'हायड्रा फेशियल'; कमी खर्चात मिळवा नैसर्गिक ग्लो

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीने करा 'हायड्रा फेशियल'. नैसर्गिक घटकांच्या मदतीने त्वचेला मिळवा हायड्रेशन, डीप क्लेन्सिंग आणि ग्लो.

Mayuri Gawade

उन्हाळा सुरू झाला की त्वचेवर त्याचा परिणाम लगेच दिसू लागतो. घाम, उष्णता आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज, कोरडी आणि थकलेली वाटू लागते. मात्र चमकदार, मऊमुलायम आणि ताजीतवानी त्वचा मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे ‘हायड्रा फेशियल’सारख्या ट्रीटमेंट्सची क्रेझ वाढली आहे. पण पार्लरमधील अशा फेशियलसाठी प्रत्येक वेळी खर्च करणे शक्य होत नाही. अशा वेळी घरच्याघरी, साध्या आणि नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने त्वचेला तितकाच ग्लो देणारा उपाय करता आला, तर?

किचनमधील काही सहज उपलब्ध गोष्टींचा वापर करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने त्वचेची खोलवर स्वच्छता, हायड्रेशन आणि नैसर्गिक चमक मिळवू शकता. चला, पाहूया ५ सोप्या स्टेप्समध्ये घरच्या घरी ‘हायड्रा फेशियल’ कसं करायचं.

स्टेप १ : बर्फाने मसाज
फेशियलची सुरुवात बर्फाने मसाज करून करा. सुती कापडात बर्फाचा खडा गुंडाळून चेहऱ्यावर २-३ मिनिटे हलक्या हाताने फिरवा. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, सूज कमी होते आणि त्वचेची छिद्रं घट्ट होण्यास मदत होते.

स्टेप २ : क्लिंजिंग
कच्च्या दुधाचा वापर करून चेहरा स्वच्छ करा. कापसाच्या बोळ्यावर दूध घेऊन संपूर्ण चेहरा आणि मान पुसून घ्या. यामुळे त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल निघून जातं आणि त्वचा स्वच्छ व मऊ वाटते.

स्टेप ३ : एक्सफोलिएशन
डेड स्किन काढण्यासाठी १ टेबलस्पून साखर, मध आणि कॉफी पावडर एकत्र करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण टोमॅटोच्या तुकड्यावर लावून चेहऱ्यावर ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी होण्यास मदत होते. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

स्टेप ४ : हायड्रेटिंग फेसपॅक
त्वचेला ओलावा देण्यासाठी १ टेबलस्पून दही, तांदळाचं पीठ, कॉफी पावडर आणि मध एकत्र करून फेसपॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावून काही मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक ग्लो मिळतो.

स्टेप ५ : मॉइश्चरायझिंग
फेशियलनंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. एलोवेरा जेल किंवा गुलाबपाणी वापरून चेहऱ्यावर हलक्या हाताने टॅपिंग करत मसाज करा. यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार राहते.

खास टिप्स :

  • संवेदनशील त्वचेसाठी स्क्रब हलक्या हाताने करा

  • नैसर्गिक घटक वापरताना ताजे पदार्थच वापरा

  • आठवड्यातून एकदाच हा फेशियल करा

  • जास्त मसाज टाळा, त्वचेवर ताण येऊ देऊ नका

कमी खर्चात आणि कमी वेळात तयार होणारं हे ‘होममेड हायड्रा फेशियल’ त्वचेला ताजेपणा आणि नैसर्गिक चमक देतं. नियमित काळजी आणि योग्य आहारासोबत हा उपाय केल्यास त्वचा अधिक निरोगी दिसू शकते.

(Disclaimer : या लेखातील माहिती ही सर्वसाधारण स्किनकेअर टिप्स आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ‘नवशक्ति’ या उपायांच्या अचूकता किंवा परिणामकारकतेची हमी देत नाही.)

BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचे भारतात आगमन; ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक

लोकल चलन, ग्लोबल व्यापार! स्थानि‍क चलनात व्यापार करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी; भांडुप ते तुर्भे साडेतीन तास

हक्काच्या जमिनीसाठी बालमित्र असलेल्या पंतप्रधानांकडे वृद्धाची तक्रार; २८१० चौ.मी. जमिनीचा वाद, CBI चौकशीची मागणी

राज्यात १०० टक्के दुष्काळाचे सावट; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची चिंता