बदलत्या हवामानात इम्युनिटी वाढवेल 'हा' खास काढा; जाणून घ्या सोपी रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

बदलत्या हवामानात इम्युनिटी वाढवेल 'हा' खास काढा; जाणून घ्या सोपी रेसिपी

हा काढा शरीराला उब देण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याससाठीही मदत करतो.

किशोरी घायवट-उबाळे

बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि घशातील खवखव यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. अशावेळी घरगुती उपाय म्हणून लिंबू आणि आल्यापासून तयार केलेला काढा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा काढा शरीराला उब देण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याससाठीही मदत करतो. विशेष म्हणजे हा काढा फक्त १५ मिनिटांत तयार होतो.

साहित्य :

  • १ इंच आलं (किसलेलं)

  • २ टीस्पून लिंबाचा रस

  • आवश्यकतेनुसार पाणी

  • चवीनुसार मध

कृती :

सर्वप्रथम आलं स्वच्छ धुवून त्याची साल काढा आणि ते किसून घ्या. एका पातेल्यात किसलेलं आलं घालून त्याचा रस काढा. त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळा. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण २ ते ३ मिनिटं चांगलं उकळा. तयार काढा गाळून गरमागरम प्या.

टिप्स :

  • काढा कोमट असतानाच प्या.

  • साखरेऐवजी मध वापरल्यास चव आणि आरोग्यदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकतो.

  • हा काढा हवाबंद बाटलीत भरून काही दिवस साठवूनही ठेवता येतो.

  • घशात जास्त खवखव असल्यास त्यात चिमूटभर काळी मिरीही घालू शकता.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले