International Yoga Day 2024: योगाभ्यास करून तुम्ही तुमचे शरीर, मन आणि आत्मा एकत्र जोडू शकता. यामुळे जीवनात संतुलन येते. आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्य आणि आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. २०१४ मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावावर २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. योग ही एक प्राचीन भारतीय प्रथा आहे. या खास दिनानिमित्त तुम्ही तुमच्या फिटनेस फ्रिक मित्रांना हे खास संदेश (International Day of Yoga 2024 Wishes, WhatsApp Status, Images, Quotes, Messages & Greetings) पाठवू शकता.
पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
> स्वस्थ जीवन जगणे, हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करणे ही रोगमुक्त
जीवनाची गुरुकिल्ली आहे
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!!
> निरोगी तन आणि शांत मन याची
गुरुकिल्ली म्हणजे योग
जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!
> नियमित करा योग,
दूर करा रोग.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
> नियमित करा योगा,
सुदृढ आरोग्य तुम्ही उपभोगा
योग दिनाच्या शुभेच्छा!!
> निर्धार नियमित योग करण्याचा
आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा
योग दिनाच्या शुभेच्छा!!
> योग हा तरुणाईचा झरा आहे. तुमचा पाठीचा कणा लवचिक असल्याने तुम्ही फक्त तरुण आहात. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)