उत्पन्न कमी तरीही ITR फाइल करणं बंधनकारक! 'हे' ६ नियम जाणून घ्या 
लाईफस्टाईल

उत्पन्न कमी तरीही ITR फाइल करणं बंधनकारक! 'हे' ६ नियम जाणून घ्या

ITR Filing 2026: उत्पन्न करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असलं तरी काही परिस्थितींमध्ये ITR फाइल करणं बंधनकारक असतं. कोणते आहेत हे ६ महत्त्वाचे नियम आणि ITR फाइल करण्याचे फायदे, जाणून घ्या.

Mayuri Gawade

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ जवळ आली आहे. अनेकांना वाटतं की करमुक्त मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असेल तर ITR फाइल करण्याची गरज नसते. मात्र, हा समज नेहमीच बरोबर नसतो. काही विशेष परिस्थितींमध्ये उत्पन्न कमी असलं तरी ITR फाइल करणं कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे हे नियम जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

करमुक्त मर्यादा किती आहे?

नवीन करप्रणालीनुसार वार्षिक ४ लाख रुपयांपर्यंत, तर जुन्या करप्रणालीनुसार २.५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असल्यास सामान्यतः कर भरावा लागत नाही. मात्र, काही विशेष अटी लागू झाल्यास ITR दाखल करणे आवश्यक ठरते.

'या' ६ परिस्थितींमध्ये ITR भरणे अनिवार्य

१. चालू (Current) खात्यात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल
एका किंवा अधिक चालू खात्यांमध्ये आर्थिक वर्षभरात १ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली असल्यास ITR भरावा लागेल.

२. परदेश प्रवासावर २ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला असेल
स्वतःच्या किंवा इतर व्यक्तीच्या परदेश प्रवासासाठी २ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास ITR दाखल करणे आवश्यक आहे.

३. वीज बिल १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल
एका आर्थिक वर्षात एकूण वीज बिल १ लाख रुपयांहून अधिक असल्यास ITR भरावा लागेल.

४. TDS किंवा TCS ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल
६० वर्षांखालील व्यक्तींसाठी वर्षभरात २५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त TDS/TCS कापला गेला असेल, तर ITR आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५० हजार रुपये आहे.

५. बचत खात्यात ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली असेल
एका किंवा अधिक बचत खात्यांमध्ये वर्षभरात एकूण ५० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा झाली असल्यास ITR दाखल करावा लागेल.

६. परदेशात मालमत्ता किंवा बँक खात्यावरील स्वाक्षरीचा अधिकार असेल
भारतातील रहिवासी असून परदेशात मालमत्ता, आर्थिक गुंतवणूक किंवा परदेशी बँक खात्यावर स्वाक्षरीचा अधिकार असल्यास ITR भरणे बंधनकारक आहे.

उत्पन्न कमी असले तरी ITR भरल्याचे फायदे

  • गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज मिळवताना ITR हा महत्त्वाचा उत्पन्नाचा पुरावा ठरतो.

  • अनेक देशांच्या व्हिसासाठी मागील काही वर्षांचे ITR आवश्यक असतात.

  • TDS कापला गेला असल्यास त्याचा परतावा (Refund) मिळवण्यासाठी ITR आवश्यक आहे.

  • शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा व्यवसायातील तोटा पुढील वर्षात समायोजित (Set-off) करण्यासाठी वेळेत ITR दाखल करणे गरजेचे असते.

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ www.incometax.gov.in वर भेट द्या.

(Disclaimer : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी असून ती आयकर विभागाच्या नियमांवर आधारित आहे. वैयक्तिक आर्थिक किंवा करसंबंधित निर्णय घेण्यापूर्वी चार्टर्ड अकाउंटंट किंवा कर सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोठी बातमी! अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा

'आता लवकर घरी परत ये...'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या भावना, Video

'लोकशाहीने कात टाकली...'; धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

"आपण करून दाखवलं!"; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

'तिरंगा मार्च'च्या एक दिवस आधी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले - 'कुठल्याही पक्षाचा झेंडा, नेत्यांच्या घोषणा नको...