लाईफस्टाईल

नोकरी हवीय? ही खबरदारी घ्या; टॉप दहा सायबर गुन्ह्यांमध्ये ‘जॉब स्कॅम’

सध्याच्या ऑनलाइनच्या जमान्यात नोकऱ्याही ऑनलाइन शोधल्या जात असताना नोकरीच्या शोधात असलेल्या पुण्यातील एका पीएचडीधारक व्याख्यात्याला अकरा लाखांना गंडा घालण्यात आला, तर नाशिक येथीक एका गृहिणीला पंधरा लाखांचा फटका बसला. अशा घटना दररोज कुठे ना कुठे घडत आहेत. नोकरी देण्याच्या बहाण्याने वैयक्तिक माहिती मिळवून फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.

रवींद्र राऊळ

रवींद्र राऊळ/मुंबई

सध्याच्या ऑनलाइनच्या जमान्यात नोकऱ्याही ऑनलाइन शोधल्या जात असताना नोकरीच्या शोधात असलेल्या पुण्यातील एका पीएचडीधारक व्याख्यात्याला अकरा लाखांना गंडा घालण्यात आला, तर नाशिक येथीक एका गृहिणीला पंधरा लाखांचा फटका बसला. अशा घटना दररोज कुठे ना कुठे घडत आहेत. नोकरी देण्याच्या बहाण्याने वैयक्तिक माहिती मिळवून फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.

नोकरीच्या शोधात असलेले बेरोजगार हे सगळ्याच ठगांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ व सहजगत्या गळाला लागणारे. नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने जितक्या बेरोजगारांना गंडा घातला गेला असेल तितके अन्य कोणत्याही वर्गातील तक्रारदार नसतील. ऑनलाईन नोकरी देण्याच्या फसव्या प्रकारांना बळी पाडून बेरोजगारांकडून दररोज कोट्यवधी रुपये उकळले जात आहेत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या गरजूंना हेरुन भरघोस पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवत ऑनलाइन घोटाळेबाज त्यांना फसवतात. हे घोटाळेबाज वेगवेगळी संकेतस्थळे आणि सोशल मीडियावर उत्तमोत्तम नोकऱ्या उपलब्ध असल्याच्या पोस्ट टाकतात किंवा ईमेल पाठवतात. गलेलठ्ठ पगार, वेगवेगळे भत्ते, सवलती आणि सहजसोप्या कामाचे आकर्षण बेरोजगारांना भुरळ पाडते.

गरजवंताला अक्कल नसते म्हणतात, त्याप्रमाणे गरजू बेरोजगार तरुण-तरुणी, गृहिणी आणि निवृत्त असे वेगवेगळ्या वर्गातील लोक घोटाळेबाजांच्या आमिषांना बळी पडतात. पण या सायबर ठगांचे ध्येय नोकरी देण्याचे नव्हे, तर बेरोजगारांकडून पैसे उकळणे किंवा त्यांची वैयक्तिक माहिती चोरणे हेच असते.

काय कराल?

  • विश्वसनीय स्रोत वापरा : खातरजमा केल्याशिवाय अनाहूत मेल अथवा पोस्टवर विश्वास ठेवण्याची चूक करू नका. खऱ्या खासगी आणि सरकारी नोकरीच्या उपलब्धतेबाबतच्या माहितीसाठी वर्तमानपत्रे अथवा संबंधित आस्थापनांची संकेतस्थळे धुंडाळा. त्यासाठी थेट जॉब पोर्टल किंवा सरकारी पोर्टल अधिक विश्वसनीय असतात.

  • विश्वासार्हता तपासा : विशेषत: विदेशी नोकरीच्या ऑफरसाठी संबंधित कंपनीची सत्यता आणि विश्वासार्हता पडताळून पहा आणि तुमच्याकडे योग्य वर्क व्हिसा असल्याची खात्री करा. कोणत्याही स्थितीत वर्क व्हिसा असल्याशिवाय परदेशी जाणे टाळा. तसे करणे अडचणीत आणू शकते.

  • प्रश्न विचारा : ऑनलाइन मुलाखतीदरम्यान, कंपनी आणि मुलाखत घेणाऱ्याबद्दल तपशीलवार प्रश्न विचारा.

  • ईमेल पडताळून पहा : खऱ्या कंपन्यांची नक्कल करणारे ईमेल पत्ते पहा. अनेक बड्या कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली बनावट संकेतस्थळे तयार करून फसवणूक केली जाते. त्यांची सत्यता तपासून पहा.

काय टाळाल?

  • आगाऊ शुल्क टाळा : कंपनीची वैधता पडताळल्याशिवाय सल्लागार शुल्क देऊ नका. नामांकित कंपन्या नोकरी देण्यासाठी उमेदवारांकडून पैशांची मागणी करीत नाहीत.

  • संशयवादी रहा : अनावश्यक नोकरीच्या ईमेलवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. वेगेवेगळ्या मार्गांनी त्या आस्थापनांचा शोध घ्या.

  • जाहिरातींची पडताळणी करा : जाहिरातींची सत्यता पडताळल्याशिवाय नोकरीसाठी अर्ज करू नका, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा ग्रुपवरील ऑफरना प्रतिसाद देऊ नका.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video