लाईफस्टाईल

Kedarnath Yatra: केदारनाथच्या यात्रेला झाली सुरुवात, पहिल्यांदाच दर्शनासाठी जात असाल तर या गोष्टी जाणून घ्या

Tejashree Gaikwad

Chardham Yatra 2024, Kedarnath Yatra: आज १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले आहेत. यासोबतच यमुनोत्री आणि गंगोत्री यात्रेलाही सुरुवात झाली आहे. यानंतर १२ मे रोजी बद्रीनाथचे दरवाजे उघडणार आहेत. दरवर्षी हजारोंच्या संख्येने इथे शिवभक्त येतात. उत्तराखंडमध्ये असलेल्या केदारनाथ मंदिरात जाण्याचा अनुभव खूप खास असतो. तिकडे जाऊन शंकराचे दर्शन घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. श्रद्धेसोबतच तिथले निसर्गसौंदर्याचे विहंगम नजारे पाहण्यासाठीही अनेकजण जातात. जर तुम्हीही यंदा पहिल्यांदाच केदारनाथला जाणार असाल तर काही गोष्टी जाणून घेणे (Travel Tips) महत्त्वाचे ठरेल. चला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते जाणून घ्या.

या गोष्टी लक्षात घ्या

> जर तुम्हाला चार धाम यात्रेला जायचं असेल तर पाहिलं ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा. Tourist Care Uttarakhand या वेब साईटवर जाणून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.

> केदारनाथला जाण्यासाठी किमान ५ ते ६ दिवसांची ट्रिप प्लॅन करा.

> तिथे वाटेत तुम्हाला अनेक हॉटेल्स, धर्मशाळा किंवा गेस्ट हाऊस दिसतील. पण त्याच बुकिंग तुम्हाला आधीच करावं लागेल.

> लक्षात घ्या केदारनाथमध्ये राहण्यासाठी विशेष सुविधा नाहीत. काही टेंट आणि रूम आहेत ज्याचं बुकिंग तुम्हाला आधीच करावं लागेल.

> केदारनाथ पर्वतांच्या उंचीवर वसलेले आहे, त्यामुळे तिथलं वातावरण सतत बदलत असते. म्हणून, प्रवास सुरू करण्यापूर्वी हवामान तपासा.

> थंडी ते पावसाळी सगळ्या प्रकारचे कपडे घेऊन जा.

> तिकडे जाताना आवर्जून रोख रक्कम सोबत ठेवा. तिकडे अनेक वेळा ऑनलाइन पेमेंट करणे कठीण होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस