लाईफस्टाईल

पिवळेपणाला करा बाय-बाय! लिंबाने मिळवा पांढरेशुभ्र दात

आपलं हास्य ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. सुंदर कपडे, परफेक्ट मेकअप किंवा आकर्षक लुक हे सगळं त्या वेळीच उठून दिसतं जेव्हा तुमचं हास्य तेजस्वी आणि आत्मविश्वासपूर्ण असतं. पण जर दात पिवळे असतील, तर तेवढं सुंदर रूपसुद्धा थोडं फिकं वाटतं.

नेहा जाधव - तांबे

आपलं हास्य ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. सुंदर कपडे, परफेक्ट मेकअप किंवा आकर्षक लुक हे सगळं त्या वेळीच उठून दिसतं जेव्हा तुमचं हास्य तेजस्वी आणि आत्मविश्वासपूर्ण असतं. पण जर दात पिवळे असतील, तर तेवढं सुंदर रूपसुद्धा थोडं फिकं वाटतं. बर्‍याच जणांना 'दात पिवळे का पडतात?' हा प्रश्न पडतो. त्यामागे अनेक कारणं दडलेली असतात. जसे की चहा-कॉफीचं जास्त सेवन, तंबाखू किंवा स्मोकिंग, काही औषधं, किंवा अगदीच साधं ब्रशिंगची चुकीची सवय. मात्र, काळजी करू नका! तुमच्या किचनमध्ये असलेलं साधं लिंबू (Lemon) हेच या समस्येचं सोपं आणि नैसर्गिक उत्तर ठरू शकतं.

लिंबातील नैसर्गिक गुणधर्म

लिंबामध्ये असतो सिट्रिक ॲसिड, जो नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून कार्य करतो. हे दातांवरील डाग आणि पिवळेपणा कमी करून त्यांना पुन्हा चमकदार बनवतं. याशिवाय लिंबामध्ये असलेलं व्हिटॅमिन C हिरड्यांना बळकटी देतं आणि श्वास ताजातवाना ठेवतं.

लिंबाचा वापर करून दात चमकदार बनवण्याचे सोपे घरगुती उपाय

लिंबाचा रस आणि पाणी

ब्रश केल्यानंतर लिंबाच्या रसात थोडं पाणी मिसळा आणि दातांवर हलकासा मसाज करा. काही मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे पिवळेपणा कमी होतो आणि श्वासही फ्रेश राहतो.

लिंबाचे साल - नैसर्गिक पावडर

लिंबाच्या साली वाळवून त्याची बारीक पूड तयार करा. दिवसातून एकदा ती पावडर दातांवर हलक्या हाताने चोळा. यामुळे दात चमकायला लागतात आणि डाग कमी होतात.

लिंबू + मीठ

एक चमचा लिंबाचा रस घ्या आणि त्यात अर्धा चमचा मीठ मिसळा. या मिश्रणाने दात आणि हिरड्यांची मॉलिश करा. हे मिश्रण दात स्वच्छ करतं, जीवाणू नष्ट करतं आणि ताजेतवानेपणा देते.

लिंबू + बेकिंग सोडा

लिंबाच्या रसात थोडा बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा. त्याने दात हलक्या हाताने ब्रश करा. हा उपाय आठवड्यातून १–२ वेळाच करा. हे एक नैसर्गिक व्हाइटनिंग ट्रिटमेंट असून पिवळेपणा दूर करतो.

आहारातले साथीदार : दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर भाज्या

फक्त लिंबावर अवलंबून न राहता, दातांसाठी उपयुक्त पोषक अन्नघटकही घ्या.

  • ब्रोकली, गाजर, भोपळा यांसारख्या व्हिटॅमिन A समृद्ध भाज्या हिरड्यांना मजबुती देतात.

  • सफरचंद, काकडी, गाजर यांसारखी फळे आणि फळभाज्या दातांवरील जमा थर (plaque) नैसर्गिकरीत्या स्वच्छ करतात.

या सवयी टाळा

  • चहा आणि कॉफीचं जास्त सेवन टाळा.

  • माउथवॉशचा अतिवापर करू नका (त्यातील अल्कोहोल दात कोरडे करतो).

  • जुना ब्रश वापरू नका – दर दोन महिन्यांनी ब्रश बदला.

  • दात खूप जोरात घासू नका – यामुळे इनेमल खराब होऊ शकतो.

घरगुती उपाय कामी नाही पडले तर…

जर घरगुती उपाय करूनही दातांचा पिवळेपणा कमी होत नसेल, तर दंततज्ज्ञांचा सल्ला घ्या.
कारण क्लिनिकमध्ये केलेले व्हाइटनिंग ट्रीटमेंट्स काही वेळा अधिक परिणामकारक असतात, पण त्यांचे दुष्परिणामही असू शकतात (जसे दात संवेदनशील होणे).

दररोज दोन वेळा ब्रश करणे, योग्य आहार घेणे आणि अधूनमधून लिंबाचा वापर करणे
या छोट्या सवयींनी तुम्ही सहज मिळवू शकता पांढरे आणि चमकदार दात.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास

वाढत्या प्रदूषणाने लावली वाट दिल्लीपाठोपाठ मुंबईची घुसमट; दिल्लीत AQI ३५९, मुंबईतील AQI २०० वर, फटाके फोडण्याच्या मर्यादांचे सर्रास उल्लंघन