freepik
लाईफस्टाईल

Travel Tips: येतोय लाँग वीकेंड 'या' शेजारील देशात बजेटमध्ये फिरायला जायचा करू शकता प्लॅन!

Budget Trip: १५ ते १८ ऑगस्ट ४ दिवसांचा लाँग वीकेंड येत आहे. या सुट्टीमध्ये तुम्ही बजेट फ्रेंडली अशा देशात फिरायला जाऊ शकता. यासाठी तुम्हाला व्हिसाची पण गरज लागणार नाही.

Tejashree Gaikwad

Nepal Travel Tips: या आठवड्यात लाँग वीकेंड येत आहे. १५ ऑगस्ट आणि शारीवर रविवारची सुट्टी आहे. तुम्हाला फक्त १६ ऑगस्टला रोजी सुट्टी घेण्याची आहे. अशापद्धतीने तुम्हाला १५ ते १८ ऑगस्ट ४ दिवसांचा लाँग वीकेंड (long weekend) येत आहे. या सुट्टीच्या काळात तुम्ही भारताचा शेजारी देश नेपाळ एक्सप्लोर करू शकता. तुम्ही ऑगस्टच्या लाँग वीकेंडमध्ये हा अतिशय सुंदर देश फिरण्याचा प्लॅन करू शकता. या निमित्तानं तुमचं परदेश प्रवासाचं स्वप्नही पूर्ण होईल. या देशाला भेट देण्यासाठी तुम्हाला इतर देशांच्या तुलनेत कमी पैसे खर्च करावे लागतील. तुम्ही सहज तीन ते चार दिवसांत नेपाळ पूर्णपणे एक्सप्लोर करू शकता.

निसर्गप्रेमींना आवडेल हे ठिकाण

जर तुम्हाला निसर्ग आवडत असेल तर आवर्जून नेपाळला भेट द्या. तिथे तुम्ही निर्सगात शांतात अनुभवू शकता. तुमच्या व्यस्त जीवनातून विश्रांती घ्यायची असेल, तर तुम्ही नेपाळच्या सुंदर खोऱ्यांमध्ये काही दिवस घालवू शकता. भगवान शिवाच्या भक्तांनी काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात जावे. या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला खूप शांत वाटेल.

कुठे कुठे फिरू शकता?

जर तुम्हाला शांत वातावरणात जायचे असेल तर तुम्ही स्वयंभूनाथ स्तूप बघायला जाऊ शकता. याशिवाय जर तुम्हाला अ‍ॅडव्हेंचर आवडत असेल ना तर तुम्ही नेपाळमध्ये ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग आणि बंजी जंपिंग देखील करू शकता. नेपाळमध्ये तुम्हाला पर्वतांपासून नद्यांपर्यंत अनेक सुंदर दृश्ये पाहायला मिळतील. नेपाळला गेल्यावर अन्नपूर्णा पर्वतरांगेचे सुंदर दृश्य पाहायला विसरू नका.

व्हिसा-पासपोर्टची लागत नाही

नेपाळला जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा-पासपोर्टची गरज लागणार नाही. भारतीय सरकारचे ओळखपत्र वापरून तुम्ही नेपाळमध्ये सहज पोहोचू शकता.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश