लाल भोपळा निम शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. मात्र, महानगरांमध्ये याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. लाल भोपळा हा वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. काशीफळ, डांगर, तांबडा भोपळा या नावानेही हा लाल भोपळा ओळखला जातो. इतकेच काय तर याच्या बियांमध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात. हा लाल भोपळा चवीला थोडासा गोडसर असतो. मात्र, तो झटपट शिजतो. तसेच ज्यांना आहारातून बटाटा वर्ज्य करायला सांगितलाय त्यांच्यासाठी लाल भोपळा हा एक उत्तम पर्याय आहे.
वजन कमी करण्यासाठी उत्तम
वाढलेल्या वजनामुळे अनेक जण हल्ली त्रस्त आहेत. यापाठीमागे अस्वस्थकर आहार, हे एक प्रमुख कारण आहे. भोपळ्यामध्ये कमी कॅलरीज असतात. तसंच त्यात मोठ्या प्रमाणावर फायबरचं प्रमाण असतं. त्यामुळे शरीरातील फॅट्स कमी होतात आणि भूकेवर नियंत्रण मिळते. त्यामुळे झटपट वजन कमी करायचे असेल तर लाल भोपळा अतिशय उपयुक्त असतो.
पचन सुधारते
भोपळ्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. बद्धकोष्ठतेसारखा त्रास दूर होतो.
डोळ्यांचे आरोग्यासाठी उत्तम
मोतीबिंदू सारख्या आजारात लाल भोपळ्याचे सेवन डोळ्यांसाठी खूपच लाभदायक असते. यामध्ये जीवनसत्त्व अ भरपूर प्रमाणात असते. याचा फायदा डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी होतो.
रोगप्रतिकारक शक्ती
भोपळ्यात जीवनसत्त्व अ सोबतच ई आणि क हे जीवनसत्व देखील आढळते. तसेच यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरिरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी भोपळा अतिशय उत्तम असतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)