LPG ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' तारखेपूर्वी पूर्ण करा e-KYC; घरबसल्या कशी कराल? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया 
लाईफस्टाईल

LPG ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' तारखेपूर्वी पूर्ण करा e-KYC; घरबसल्या कशी कराल? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

LPG ग्राहकांसाठी e-KYC ची अंतिम मुदत जवळ आली आहे. घरबसल्या मोबाईलवरून LPG e-KYC कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया.

Mayuri Gawade

घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस कनेक्शनसाठी आधार आधारित e-KYC अनिवार्य केली असून, १६ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपूर्वी e-KYC पूर्ण न केल्यास गॅस सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र, यासाठी गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. ही प्रक्रिया घरबसल्या मोबाईलवरून अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करता येते.

१६ ऑगस्टपूर्वी e-KYC का महत्त्वाची?

माहितीनुसार, निर्धारित मुदतीत e-KYC पूर्ण न केल्यास पुढील अडचणी उद्भवू शकतात.

  • गॅस सबसिडी मिळण्यात अडथळे येऊ शकतात.

  • सवलतीच्या दरात एलपीजी सिलिंडर मिळण्यावर परिणाम होऊ शकतो.

  • भविष्यात गॅस सेवेशी संबंधित काही सुविधा वापरताना पडताळणीची अडचण निर्माण होऊ शकते.

म्हणूनच सर्व पात्र ग्राहकांनी अंतिम मुदतीपूर्वी e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घरबसल्या मोबाईलवरून e-KYC करण्यासाठी तुमच्याकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे.

  • १२ अंकी आधार क्रमांक

  • आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर

  • Aadhaar FaceRD हे अधिकृत ॲप

  • संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत मोबाईल ॲप

घरबसल्या e-KYC करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे -

स्टेप १ : गॅस कंपनीचे अधिकृत ॲप डाउनलोड करा

तुमच्या गॅस कनेक्शननुसार अधिकृत ॲप डाउनलोड करा.

  • Indane – IndianOil One

  • Bharat Gas – Hello BPCL

  • HP Gas – HP Pay

स्टेप २ : मोबाईल नंबरने लॉगिन करा

गॅस कनेक्शनसोबत नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून ॲपमध्ये लॉगिन करा. नवीन वापरकर्ता असल्यास प्रथम नोंदणी करा.

स्टेप ३ : e-KYC पर्याय निवडा

ॲपमधील 'Link Aadhaar', 'Aadhaar Authentication' किंवा 'e-KYC' हा पर्याय निवडा.

स्टेप ४ : आधार पडताळणी पूर्ण करा

तुमचा आधार क्रमांक टाका. त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP भरून पडताळणी पूर्ण करा.

स्टेप ५ : Face Authentication करा

आता Face Scan पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Aadhaar FaceRD ॲप उघडेल. कॅमेऱ्यासमोर चेहरा आणून सूचनांनुसार फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करा. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, त्याच व्यक्तीचा चेहरा स्कॅन करणे आवश्यक आहे.

स्टेप ६ : प्रक्रिया पूर्ण करा

फेस ऑथेंटिकेशन यशस्वी झाल्यानंतर तुमची e-KYC पूर्ण झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल. संपूर्ण प्रक्रिया साधारण ५ मिनिटांत पूर्ण होते आणि यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका

अंतिम मुदतीच्या काळात सर्व्हरवर ताण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे १६ ऑगस्ट २०२६ पूर्वीच e-KYC पूर्ण केल्यास गॅस सबसिडी आणि इतर सेवांचा लाभ सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"सुरुवातीपासूनच सरकार आणि यंत्रणा त्यांना वाचवत होती"; बृजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर विनेश फोगटची पहिली प्रतिक्रिया

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

नागपुरात मैत्रीला काळीमा! ३ हजारांच्या उधारीपायी मित्रालाच संपवलं, दोघे अटकेत

Mumbai Ganesh Aagman 2026 : बाप्पाच्या आगमनाला सुरुवात! लालबाग-परळमध्ये जल्लोष; अनेक मूर्ती गुजरातकडे रवाना, VIDEO

आयटीमध्ये आता नवीन रोजगार नाही; AI आणि डेटा सेंटर उभारणीसाठी गुंतवणूक होत आहे - श्रीधर वेम्बू