'एआय'ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

Maghi Ganesh Jayanti 2026 : माघी गणेश जयंतीला बाप्पाच्या नैवेद्यात करा खास तिळगुळाचे मोदक!

माघी गणेश जयंतीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असेही म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी तिळ-गुळाला विशेष महत्त्व आहे. आज माघी गणेश जयंतीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यात तिळगुळाचे मोदक अर्पण करून हा सण अधिक खास बनवू शकता. चला तर जाणून घेऊया तिळगुळाचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी...

Mayuri Gawade

माघी गणेश जयंतीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असेही म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी तिळ-गुळाला विशेष महत्त्व आहे. तिळ हे पवित्रता आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते, तर गूळ शरीराला ऊर्जा आणि उबदारपणा देतो. माघ महिन्यातील थंडीत तिळ-गुळाचे मिश्रण आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. त्यामुळे आज माघी गणेश जयंतीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यात तिळगुळाचे मोदक अर्पण करून हा सण अधिक खास बनवू शकता. चला तर जाणून घेऊया तिळगुळाचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी...

साहित्य :

  • गूळ - १ वाटी

  • तीळ - १ वाटी

  • कणीक - २ वाट्या

  • तूप - आवश्यकतेनुसार

कृती :

सर्वात आधी कणीक नीट मळून झाकून बाजूला ठेवा. त्यानंतर एका कढईत तीळ मंद आचेवर सावकाश भाजून घ्या; तीळ जळणार नाहीत याची काळजी घ्या आणि त्यांचा रंग बदलू देऊ नका. वेगळ्या भांड्यात गुळाचा पाक तयार करा. पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेले तीळ घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्या. आता मळलेल्या कणकेचे छोटे गोळे करून त्याची पातळ पोळी लाटा. या पोळीत तिळ-गुळाचे सारण भरा आणि मोदकाचा आकार द्या. कढईत तूप गरम करून हे मोदक मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तिळ-गुळाचे सारण थोडे गरम असतानाच साच्यात भरून मोदकाचा शेप दिल्यास मोदक अधिक सुंदर आणि आकर्षक तयार होतात.

लक्षात ठेवा -

  • तिळ जास्त भाजले गेले तर कडू लागतात, त्यामुळे मंद आचेवरच भाजा.

  • सारण फार घट्ट किंवा फार पातळ करू नका, नाहीतर मोदक भरताना अडचण येते.

  • मोदक अधिक चवदार हवेत तर सारणात थोडे तूप मिसळू शकता.

  • तळताना तेल किंवा तूप जास्त गरम नसावे, नाहीतर मोदक पटकन काळे पडतात.

  • नैवेद्यासाठी मोदक तयार झाल्यावर थोडेसे तूप वरून लावल्यास त्यांना छान चकाकी येते.

नवी मुंबई विमानतळ नेटवर्क वाद : NMIAL वर आरोप, TRAI अ‍ॅक्शन मोडमध्ये; टेलिकॉम दरांची तपासणी सुरू

BCB ला फक्त २ मतं, ICC कडून शेवटचा २४ तासांचा अल्टीमेटम; बांगलादेश सरकारने खेळाडूंची तातडीची बैठक बोलावली, आज अंतिम निर्णय

ग्रीनलँड वाद शमण्याची चिन्हे! ट्रम्प यांचा यू-टर्न; युरोपियन देशांवर टॅरिफची धमकी मागे घेतली, बळाचा वापर करणार नसल्याचंही केलं स्पष्ट

तपासणीच्या बहाण्याने विमानतळ कर्मचाऱ्याचे कोरियन महिलेसोबत अश्लील कृत्य; पुरुषांच्या वॉशरूमजवळ घेऊन गेला अन्...

शिंदेसेनेला मिळू शकते एक वर्षासाठी महापौरपद; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंना दणका देण्याची भाजपची नवी खेळी